Ajit Pawar Passed Away: खासदार, आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री; महाराष्ट्राच्या लाडक्या अजितदादांचा राजकीय प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 10:33 IST2026-01-28T10:32:05+5:302026-01-28T10:33:07+5:30
अजित पवारांनी आतापर्यंत शिक्षण, सहकार, क्रीडा, कृषी अशा अनेक विभागांमध्ये आपली भूमिका पार पाडली आहे. मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते अशी पदं अजित पवारांनी भूषवली आहेत.

Ajit Pawar Passed Away: खासदार, आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री; महाराष्ट्राच्या लाडक्या अजितदादांचा राजकीय प्रवास
पुणे : आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमानअपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. या अपघातातअजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचे लाडके नेते गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवारांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला.
त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील 'देवळाली-प्रवरा' या ठिकाणी झाला. अजित पवार हे शरद पवारांचे मोठे भाऊ अनंतराव पवार यांचे सुपुत्र आहेत. अजित पवार यांचा विवाह राजकीय नेते पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा यांच्याशी झाला. अजित पवार यांना पार्थ आणि जय अशी दोन मुलं आहेत. अजित पवार यांनी त्यांचे दहावीपर्यंचे शिक्षण देवळाली प्रवरा येथेच पूर्ण केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले होते. त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत पूर्ण केलं. त्यांच्याकडे बी. कॉम. ही पदवी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी राजकीय बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांनी 5 वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांचा खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री ते विरोधी पक्ष नेते असा अजित पवार यांचा राजकीय प्रवास आहे.
इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून अजित पवारांनी कामगिरी बजावली. १९९१ साली पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांची निवड झाली. अजित पवार १९९१ साली बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले. या काळात ते कृषी, फलोत्पादन आणि उर्जा या खात्याचे राज्यमंत्री होते. १९९१ ते १९९५ या काळात ते विधानसभा सदस्य होते. अजित पवार नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ या काळात जलसंधारण, ऊर्जा आणि नियोजन या खात्याचे राज्यमंत्री होते. १९९१ सालपासून अजित पवार विधानसभा सदस्य आहेत. १९९९ ते २००४ या काळात ते पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे आणि फलोत्पादन या खात्याचे राज्यमंत्री होते. १९९५ पासून २०१९ पर्यंत सलग ७ वेळा अजित पवार बारामती विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. अजित पवारांनी आतापर्यंत शिक्षण, सहकार, क्रीडा, कृषी अशा अनेक विभागांमध्ये आपली भूमिका पार पाडली आहे. मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते अशी पदं अजित पवारांनी भूषवली आहेत.