शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

मोहननगरावर शोककळा

By admin | Updated: March 12, 2015 06:17 IST

अपघाताची बातमी बुधवारी सकाळी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. ऐन सणादिवशी या परिसरात रंगाचा बेरंग झाला. भोसले कुटुंबावर काळाने घाला

पिंपरी : अपघाताची बातमी बुधवारी सकाळी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. ऐन सणादिवशी या परिसरात रंगाचा बेरंग झाला. भोसले कुटुंबावर काळाने घाला घातल्याने मोहननगर परिसरात शोककळा पसरली. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे परिसरात शांतता पसरली होती. बुधवारी सकाळी भोसले कुटुंबातील प्रलोभ भोसले याला पोलिसांनी अपघाताची माहिती दिली. या वेळी घरात आई लिलाबाई व प्रसुतीसाठी आलेली त्यांची मुलगी होती. प्रलोभने प्रसंगावधान राखून घरातील आईला व बहिणीला छोटासा अपघात झाल्याचे सांगीतले. बिल्डिंग मधील रहिवासी व नगरसेवक अविनाश टेकवडे, माजी नगरसेवक मारुती भापकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश जाधव, निलेश लुंकड घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान, बिल्डिंगजवळ गर्दी वाढू लागली. परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. रंगपंचमीचा सण साजरा करण्यासाठी लगबग सुरु असताना अशी धक्कादायक घटनेची वार्ता आल्याने परिसरात शांतता पसरली.मुळचे कोकणातील दत्तात्रय भोसले कामानिमित्त शहरात आले. सुरूवातील रामनगरात भाड्याच्या ते खोलीत रहात होते. १८ वर्षांपासून मोहननगरातील लिलाविहार इमातीमधील सदनिकेत राहत होते. टाटा मोटर्स कंपनीत ते काम करत होते. मनमिळावू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती.प्रवीण हा एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याला अभिनयाची आवड होती. त्याने आजवर चार नाटकांत काम केले आहे. हसतमुख व्यक्तिमत्व अशी त्याची ओळख होती. तीन वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. गावची यात्रा असल्याने भोसले कुटुंबीय रविवारी सकाळी चिंचवडहून कोकणातील खेड तालुक्यात असणाऱ्या खुपी शिरगाव या ठिकाणी गेले होते. यात्रेनिमित्त घरात पालखी आल्याने यात्रेचा आंनद घेऊन भोसले कुटुंब बुधवारी पहाटे चिंचवडकडे निघाले. प्रवीणला कामावर जायचे असल्याने इच्छा असूनही गावाला जास्त दिवस राहता आले नाही. त्यामुळेच त्यांनी रात्री निघण्याचा निर्णय घेतला. प्रविणची पत्नी खासगी कंपनीत कामाला होती. परंतु घरी कामे असल्याने सध्या ती सुट्टीवर होती. मनमिळाऊ स्वभाव असल्याने तिच्या जाण्याने येथील रहिवाशांना धक्का बसला आहे.त्यांचा दोन वर्षांचा मुलगा शौर्य हा या अपघातात काळाच्या पडद्याआड झाला. बिल्डिंगमधील सर्वचजण त्याला लाडाने पिल्लू म्हणत होते. रहिवाशांचे डोळे पाणावले होते.त्याच्या बरोबर खेळणारे बालचमुही स्तब्ध झाले होते. त्याचा गोंडस चेहरा सर्वांचाच लाडका होता. त्यामुळे ते पिल्लू घरात कमी; परंतु बिल्डिंग मधील रहिवाशांकडेच जास्त खेळायचे. मागील महिन्यात त्याचा वाढदिवस थाटात साजरा केला होता. कुटुंबातील पहिलाच मुलगा असल्याने तो सर्वांचाच लाडका होता. संगीता शिंदे या प्रवीणच्या सासु होत्या. त्यांना फिरण्याची खूप आवड होती. गावची यात्रा असल्याने त्याही भोसले परिवाराबरोबर गेल्या होत्या. कार्यक्रम कोणताही असो त्यांचा पुढाकार असायचा सर्वांशी आपुलकीने बोलायच्या. त्यामुळे त्यामुळे त्यांचा बोलका स्वभाव सर्वांनाच परिचित होता.(वार्ताहर)