शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

नेकलेस पाॅइंटच्या वळणावर मोटार कारचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST

भोर : भोर-पुणे रस्त्यावरील संगमनेर गावच्या हद्दीत खंडोबाचा माळ नावाने ओळखल्या जाणाऱ्या मार्गावरील अवघड वळणावर दगडाला धडक लागून ...

भोर : भोर-पुणे रस्त्यावरील संगमनेर गावच्या हद्दीत खंडोबाचा माळ नावाने ओळखल्या जाणाऱ्या मार्गावरील अवघड वळणावर दगडाला धडक लागून झालेल्या अपघातात नारायण बांदल या नावाची व्यक्ती गंभीर जखमी झाली. या अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला आहे.

या वळणावर नीरा नदीवरील नेकलेस पाॅइंट असून या विहंगम दृश्य पाहण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आपली वाहने रस्त्यावर पार्क करतात. त्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या वळणावर नो पार्किंगचा फलक लावला जावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सोमवारी सायंकाळी या मार्गावर एमएच १२ केटी ४४६२ या मोटारकारला अपघात झाला. कार उतारावरून पलटी होत गडगडली असून मोटारीतील नारायण बांदल हे गंभीर जखमी झाले. त्यांना सह्याद्री रेस्क्यू फोर्सच्या पथकाने मदत करुन बांदल यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

राजगड पोलिसांत याविषयी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.

चौकट-

नेकलेस पाॅइंट येथे नो पार्किंग झोन करावा

भोर तालुक्यातील भोर पुणे मार्गावरील खंडोबाचा माळ येथील वळनावर निरानदीच्या पाण्यात नेकलेस पाॅइंटचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मात्र, पर्यटक वाहने रस्त्यावर लावून जातात. त्यामुळे अनेकदा या ठिकाणी वाहतूककोंडी होते. शिवाय लहानमोठे अपघातही घडतात. कालच्या अपघातात कार नदीत पडता पडता वाचली. यामुळे या ठिकाणी नो पार्किंग झोन करण्याची मागणी होत आहे.

फोटो : नेकलेस पाॅइंट येथे मोटारीचा झालेला अपघात.