Pune Crime: वाघोलीत आईचे अमानुष कृत्यं; १० वर्षीय पोटच्या मुलाचा गळा चिरून खून; मुलीवरही प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 11:20 IST2026-01-27T11:20:13+5:302026-01-27T11:20:56+5:30

सकाळच्या सुमारास महिलेने काही कारणावरून अचानक टोकाचे पाऊल उचलत धारदार शस्त्राने मुलाच्या गळ्यावर वार केला

Mother inhuman acts in Wagholi 10-year-old son murdered by slitting his throat; daughter also attacked in wagholi pune | Pune Crime: वाघोलीत आईचे अमानुष कृत्यं; १० वर्षीय पोटच्या मुलाचा गळा चिरून खून; मुलीवरही प्राणघातक हल्ला

Pune Crime: वाघोलीत आईचे अमानुष कृत्यं; १० वर्षीय पोटच्या मुलाचा गळा चिरून खून; मुलीवरही प्राणघातक हल्ला

किरण शिंदे 

पुणे : पुण्यातील वाघोली परिसरातून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका आईने स्वतःच्या 11 वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याच घटनेत 13 वर्षांच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला असून, सुदैवाने ती मुलगी बचावली आहे. वाघोलीत अवघ्या दोन दिवसांत घडलेली ही दुसरी निर्दयी घटना असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही घटना वाघोली येथील बाईफ रोड परिसरात घडली. सोनी संतोष जायभाय, मूळ रहिवासी कंधार, जिल्हा नांदेड, सध्या वाघोली येथे बायफ रोडवर वास्तव्यास असलेल्या महिलेने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत 11 वर्षांचा मुलगा साईराज संतोष जायभाय याचा जागीच मृत्यू झाला. तर 13 वर्षांची मुलगी धनश्री संतोष जायभाय गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाघोलीत या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं असून, नेमकं हे कृत्य का करण्यात आलं, याचा तपास सुरू आहे. कौटुंबिक वाद की मानसिक तणाव, यामागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. वाघोलीत सतत घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पोलिसांचे अश्या घटनेकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू वाघोली पोलीस करत असून,आम्ही या बातमीवर लक्ष ठेवून आहोत.

Web Title : वाघोली में माँ की क्रूरता: बेटे की हत्या, बेटी गंभीर रूप से घायल

Web Summary : वाघोली में एक माँ ने अपने 11 वर्षीय बेटे की हत्या कर दी और अपनी 13 वर्षीय बेटी को गंभीर रूप से घायल कर दिया। पुलिस इस भयावह कृत्य के पीछे के मकसद की जांच कर रही है, पारिवारिक विवाद या मानसिक तनाव की संभावना तलाश रही है। घटना से इलाके में डर और तनाव का माहौल है।

Web Title : Mother's Cruelty in Wagholi: Son Murdered, Daughter Critically Injured

Web Summary : In Wagholi, a mother tragically murdered her 11-year-old son and critically injured her 13-year-old daughter. Police are investigating the motive behind this horrific act, exploring possible family disputes or mental stress. The incident has created fear and tension in the area.