काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार विजयी

By Admin | Updated: August 8, 2015 00:43 IST2015-08-08T00:43:05+5:302015-08-08T00:43:05+5:30

पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाल्याची माहिती युवा नेते संजय जगताप यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

Most of the Congress candidates won | काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार विजयी

काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार विजयी

सासवड : पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाल्याची माहिती युवा
नेते संजय जगताप यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. तालुक्यात एकूण ५४८ सदस्यांपैकी ३२५ सदस्य काँग्रेसचे असल्याचे जगताप यांनी सांगितले.
तालुक्यातील देवडी, नारायणपूर, मावडी क.प., कोडीत बुद्रुक, माहूर, रिसे, पिंगोरी, हरणी, लपतळवाडी, हिवरे, धालेवाडी, टेकवडी, राख इ. १४ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. नीरा, कोळविहीरे, पिंपरे, पानवडी, शिवरी, दिवे, सोमुर्डी, पिसर्वे, पारगाव, नायगाव, मावडी सुपे, बोपगाव, गुऱ्होळी, गराडे, कुंभारवळण, झेंडेवाडी, आंबोडी, भिवडी, नाझरे, सुपे, साकुर्डे, सोनोरी, खळद, सुपे, कोडीत खुर्द इत्यादी २४ ग्रामपंचायतीत काँगेसची इतर पक्षांबरोबर आघाडी आहे. बिनविरोध झालेल्या खानवडी, पोंढे, बेलसर, केतकावळे या ग्रामपंचायतीत पक्षाची प्रमुख भूमिका आहे. या सर्व निकालाची परिस्थिती पाहता तालुक्यातील जनतेने काँग्रेस पक्षाला एक क्रमांकाचे स्थान दिल्याचे संजय जगताप म्हणाले.

Web Title: Most of the Congress candidates won