सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून विनयभंग; पतीच्या मित्रावर गुन्हा दाखल

By भाग्यश्री गिलडा | Updated: March 1, 2024 14:36 IST2024-03-01T14:35:59+5:302024-03-01T14:36:57+5:30

आरोपी आणि पतीच्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्या मोबाईलवरून फेसबुकवर महिलेचा फोटो अपलोड केला

Molestation by viralizing photos on social media A case has been filed against the husband's friend | सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून विनयभंग; पतीच्या मित्रावर गुन्हा दाखल

सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून विनयभंग; पतीच्या मित्रावर गुन्हा दाखल

पुणे: सोशल मीडियावर महिलेचा फोटो व्हायरल करत त्यावर अश्लील कमेंट करुन विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी फिर्यादी महिलेच्या पतीचा मित्र महादेव सुरवसे (रा. मुरुड, लातुर) याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत वाघोली येथे राहणाऱ्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.२९) सकाळच्या सुमारास घडला आहे. आरोपी हा फिर्यादी यांच्या पतीचा मित्र असल्याने एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपीने काहीतरी वादातून फिर्यादी यांच्या पतीला शिवीगाळ केली. भांडणाचा राग मनात धरून आरोपीने त्याच्या मोबाईलवरून फेसबुकवर महिलेचा फोटो अपलोड केला. तसेच तो फोटो व्हायरल करुन त्यावर अश्लील कमेंट केली. ही बाब फिर्यादी यांना समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे करत आहेत.

Web Title: Molestation by viralizing photos on social media A case has been filed against the husband's friend