शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंड सचिन पोटे याच्यासह १० जणांवर मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:10 IST

पुणे : संघटित टोळी तयार करुन त्यांच्यामार्फत गुन्हेगारी कृत्य करुन दहशत निर्माण करणार्‍या कुख्यात गुंड सचिन पोटे याच्यासह त्याच्या ...

पुणे : संघटित टोळी तयार करुन त्यांच्यामार्फत गुन्हेगारी कृत्य करुन दहशत निर्माण करणार्‍या कुख्यात गुंड सचिन पोटे याच्यासह त्याच्या टोळीतील १० जणांवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

सचिन निवृत्ती पोटे (वय ४०, रा. जोशीवाडा, नवी पेठ), अजय शिंदे (वय ३६, रा. कल्याणीनगर, येरवडा व खडक पोलीस लाईन), विठ्ठल शेलार (वय ३८, रा. उरवडे, ता. मुळशी), अजिंक्य ऊर्फ अजय ऊर्फ अज्जू पायगुडे (वय २८, रा. मानाजीनगर, नर्‍हे), दगडु वैद्य (वय ३६, रा. जोशी वाडा, नवी पेठ), अनुप कांबळे (वय ३६, रा. आंबेडकर सोसायटी, येरवडा), अतिक शेख (वय ३३, रा. आदर्शनगर, वडगाव शेरी), मुन्ना ऊर्फ हेमंत कानगुडे (वय ३५, रा. खिलारेवाडी, कर्वे रोड), बाबू ऊर्फ अंकुश निवेकर (वय २६, रा. भिमनगर, पौड फाटा) अमोल चव्हाण (वय ३१, रा. बुधवार पेठ) अशी मोक्का कारवाई झालेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेतील युनिट ४ चे पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी या टोळीत अजिंक्य पायगुडे, अनुप कांबळे, अतिक शेख, मुन्ना कानगुडे आणि बाबू निवेकर या पाच जणांना अटक केली आहे. इतरांचा शोध सुरु आहे.

विशाल मोदी यांच्या पत्नी प्रिती यांचा वाढदिवस असल्याने ते १५ जून २०१८ रोजी हॉटेल वायकीकी टिकी लाऊंज हॉटेलमध्ये गेले होते. वाढदिवस साजरा करीत असताना सचिन पोटे आणि निलेश चव्हाण यांच्यामध्ये वाद झाला. त्यावेळी सचिन पोटे याने निलेश चव्हाणवर गोळीबार केला. पंरतु, निलेशने गोळी चुकविली. सचिन पोटे याने गोळीबार करुन निघून जाताना त्याच्या साथीदारांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर घेऊन गेले होते. सचिन पोटेच्या भीतीमुळे त्यांनी इतके दिवस तक्रार दिली नव्हती. त्यानुसार विशाल मोदी यांनी गुन्हे शाखेत येऊन तक्रार दिली.

आरोपींनी संघटीत टोळीच्या माध्यमातून गुन्हा केला असल्याने पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी या गुन्ह्यात मोक्काचा समावेश करण्याचा अहवाल दिला. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्याकडे हा अहवाल पाठविण्यात आला. मोराळे यांनी त्यास मंजुरी देण्यात आली असून सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे हे तपास करीत आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन व वैयक्तिक मार्गदर्शन करुन सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाईवर भर दिलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २१ मोक्का अंतर्गत कारवाया करण्यात आल्या असून १५ एमपीडीए अंतर्गत कारवाया करण्यात आल्या आहेत.