शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलमुळे मुले बनताहेत एकलकोंडी !

By admin | Updated: October 3, 2015 01:47 IST

काय करणार मोबाईल हातात दिल्याशिवाय तो एक घास खात नाही... मोबाईलशिवाय तो राहातच नाही आणि सतत रडत राहतो... काय करावे कळेनासे झालंय... असे संवाद घरोघरी ऐकू येतात.

पुणे : काय करणार मोबाईल हातात दिल्याशिवाय तो एक घास खात नाही... मोबाईलशिवाय तो राहातच नाही आणि सतत रडत राहतो... काय करावे कळेनासे झालंय... असे संवाद घरोघरी ऐकू येतात. मुलांना गेम खेळण्यासाठी किंवा गाणी ऐकणे, व्हीडिओ पाहणे यासाठी सतत मोबाईल लागतो. पण याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम धोकादायक आणि दूरगामी असल्याचे चित्र आहे. मोबाईलचा सातत्याने वापर केल्याने मुले एकलकोंडी, हट्टी होतात. सुरुवातीला गंमत म्हणून हातात दिला जाणारा मोबाईल कालांतराने सवय बनतो आणि ही गोष्ट मुलांच्या सामाजिक आणि वैयक्तिक आरोग्यासाठीही धोकादायक होत आहे. अनेकदा मुले धमकीही देण्यास पुढे-मागे पाहत नाहीत, असे चिकित्सा मानसोपचारतज्ज्ञ उज्ज्वल नेने यांनी सांगितले. यात ८ वर्षे वयोगटापासून पुढील मुलांचा समावेश असतो. मोबाईल न दिल्यास मी जेवणार नाही, शाळेत जाणार नाही, अभ्यास करणार नाही, घर सोडून जाईन अशा प्रकारच्या धमक्याही मुले पालकांना देतात. ५ वर्षे वयाच्या आतील मुलांच्या हातात सतत मोबाईल असेल तर त्यांचा बौद्धिक विकास खुंटतो, त्यांच्या भाषिक क्षमतांवर मर्यादा येतात. तसेच काही मुले स्वमग्न झाल्याचीही उदाहरणे आहेत.सततच्या मोबाईल वापराने कल्पनाशक्ती खुंटते, बुद्धीला चालना मिळेनाशी होते तसेच मोबाईलच्या स्क्रीनकडे सातत्याने पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो, स्क्रीनकडे पाहून डोळे कोरडे होतात, डोळ्यांतून पाणी येते, असे डॉ. जाई केळकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)