शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट टोल पावत्यांद्वारे सव्वादोन कोटींचा गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोलनाका आणि आणेवाडी टोलनाका या ठिकाणी बनावट पावत्याद्वारे २ महिन्यांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोलनाका आणि आणेवाडी टोलनाका या ठिकाणी बनावट पावत्याद्वारे २ महिन्यांपासून वापरली जात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. गेल्या २ महिन्यांत सुमारे २ कोटी २८ लाख रुपयांच्या अशा बनावट पावती पुस्तकांद्वारे टोलवसुली केल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

सुरेश प्रकाश गंगावणे (वय २५, रा. वाई, सातारा), अक्षय तानाजी सणस (वय २२, रा. वाई, सातारा), शुभम सीताराम डोलारे (वय १९, रा. जनता वसाहत,पुणे), साई लादूराव सुतार (वय २५, रा. कात्रज, पुणे), अजय काशीनाथ चव्हाण (वय १९, रा. वाई, सातारा), संकेत जयंत गायकवाड (वय २२, रा.जावळी, सातरा), अमोल कोंडे (वय ३६, रा.खेड शिवापूर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली. खेड शिवापूर टोलनाक्याच्या ऑडिट रिपोर्ट दरम्यान २४ फेब्रुवारी रोजीच्या पाहणीत सुमारे २ हजार वाहने २४ तासांच्या कालावधीत ३ लाख ८० हजार बनावट पावत्या देऊन सोडून देण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार सुरेश गंगावणे, अक्षय सणस, शुभम डोलारे, साई सुतार यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे टोलवसुली वापरत असलेल्या बनावट पावत्या जप्त करण्यात आल्या.

खेड शिवापूर टोलनाक्यावर बनावट पावत्या तयार करुन वाहन चालकांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार अभिजित बाबर (रा.मंगळवार पेठ,पुणे) यांनी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने खेड शिवापूर टोलनाका येथे खातरजमा केली असता, त्या ठिकाणचे टोल कर्मचारी शेवटच्या लेन मध्ये टोलवसुलीची १९० रुपयांची बनावट पावती देऊन फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांचे साथीदार हेमंत भाटे, दादा दळवी, सतीश मरगजे व इतर साथीदार यांचेवर टोल नाक्यावर वाहनचालकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

कॉन्ट्रक्टर पोलिसांच्या रडारवर

टोल कर्मचारी पुणे-सातारा टोल रोड प्रा.लि. या कंपनीस टोलची पावती देत असते, त्याचप्रमाणे बनावट पावती आरोपी लॅपटॉपला प्रिंटर लावून पर्यायी सॉफ्टवेअर द्वारे पावती छापत असल्याचे चौकशीत समोर आाले आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अजय चव्हाण, संकेत गायकवाड, अमोल कोंडे यांनाही अटक करण्यात आली आहे. अमोल कोंडे या कॉन्ट्रॅक्टर सोबतच विकास आण्णा शिंदे (वाई, सातारा), मनोज दळवी (भोर,पुणे), सतीश मरगजे, हेमंत बाठे हे फरार झालेल्या कॉन्ट्रॅक्टरचा पोलीस शोध घेत आहे.

........

या बनावट टोल पावत्यांचा घोटाळा हा खूप मोठा असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. या घोटाळ्याशी संबंधित सर्व बाबींची कसून चौकशी करण्यात येत असून त्याच्या मुळापर्यंत जाऊन त्याची पाळेमुळे खोदून काढणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.

..