शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वाद टोकाला! नववीतील विद्यार्थ्याचा दोघांवर चाकूने प्राणघातक हल्ला, पालकवर्ग चिंतेत, जुन्नरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 13:10 IST

मानेवर, पाठीवर व डोक्यावर वार करण्यात आल्याने दोघेही विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

वडगाव आनंद : किरकोळ वादातून नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्याच शाळेतील दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २५ फेब्रुवारी) दुपारी विद्यालयाच्या आवारात घडली. या प्रकरणी आळेफाटा पोलिस ठाणे येथे अल्पवयीन आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीमती रेवूबाई बाळाजी देवकर विद्यालय येथे नववीतील एका विद्यार्थ्याचा त्याच शाळेतील दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत वाद सुरू होता. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांवर आरोपीने चाकूने हल्ला केला. मानेवर, पाठीवर व डोक्यावर वार करण्यात आल्याने दोघेही विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ मारुती यादव (वय १४) हा शाळेतील सुट्टीदरम्यान शौचालयाजवळ उभा असताना संबंधित विद्यार्थ्यांमध्ये भांडण सुरू होते. ते सोडविण्यासाठी आयुष गणेश वाळुंज पुढे गेला असता आरोपीने त्याच्यावर वार केले. त्यानंतर पार्थ यादव हा आयुषला वाचविण्यासाठी पुढे सरसावला असता त्याच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला, असे फिर्यादीत नमूद आहे. जखमी विद्यार्थी सध्या उपचाराधीन असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.

या घटनेप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९ अन्वये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास आळेफाटा पोलिस ठाणे करत आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांमधील किरकोळ वाद अशा टोकाला जात असल्याच्या घटना वाढत असल्याने पालकवर्गात चिंता व्यक्त होत आहे. वडगाव आनंद येथील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शाळा व्यवस्थापन व पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये समुपदेशन व शिस्तीवर अधिक भर देण्याची गरज व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Minor Dispute Escalates: Student Stabs Two, Parents Concerned in Junnar

Web Summary : A ninth-grade student in Wadgaon Anand stabbed two fellow students after a minor dispute at school. The injured students are hospitalized, and police have registered a case of attempted murder. The incident has caused concern among parents.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याJunnarजुन्नरEducationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षकSchoolशाळा