शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर येथे होणार मिनी बालेवाडी स्टेडियम; ५५ कोटींचा निधी मंजूर, कृषिमंत्री भरणेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 09:53 IST

निधीतून इंदापूर सारख्या ग्रामीण भागात मिनी बालेवाडी क्रीडा संकुल उभा राहणार असल्याने खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण

बारामती: इंदापूर येथे मिनी बालेवाडी स्टेडियम होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाच्या माध्यमातून तब्बल ५५ कोटींच्या निधीस मान्यता दिल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.        महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण २०१२ अन्वये प्रत्येक तालुक्यात तालुका क्रीडा संकुल उभारणे ही शासनाची महत्वकांक्षी योजना आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करणे हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे. सद्यस्थितीत इंदापूर येथे क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु खेळाडू आणि नागरिकांनी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्याकरिता तत्कालीन क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी केली होती. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, विद्यमान क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सहकार्यातून कृषिमंत्री  भरणे यांनी सदर प्रस्तावास मान्यता घेतली आहे. त्यानुसार सध्याच्या प्रचलित संकुलामध्ये ५५ कोटी रुपयांच्या क्रीडा सुविधा उभा करण्याकरिता शासनाने नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल ग्रास मैदान,व्हॉलीबॉल कोर्ट सिंथेटिक, विविध खेळांचे इनडोअर हॉल,फ्लड्स लाइट्स, मुले व मुलींकरिता स्वतंत्र वस्तीग्रह, अंतर्गत रस्ते,अद्यावत व्यायाम शाळा साहित्यसह स्वतंत्र बॅडमिंटन हॉल, ट्रॅकच्या दोन्ही बाजूस पवेलियन, सुंदर असे लँडस्केपिंग, पाणीपुरवठा व सोलर, अद्यावत शूटिंग रेंज, स्क्वॉश कोर्ट, क्लब हाऊस, व्हीआयपी कॉन्फरन्स हॉल आदी क्रीडा सुविधांची निर्मिती होईल. बुधवारी (दि ६) शासनाने याबाबत अध्यादेश काढत तालुका क्रीडा संकुलास खासबाब निधी मंजूर केला आहे. या निधीतून इंदापूर सारख्या ग्रामीण भागात मिनी बालेवाडी क्रीडा संकुल उभा राहणार असल्याने खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरBalewadiबालेवाडीMONEYपैसाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस