विद्यापीठात मराठी भाषा केंद्र स्थापनेसाठी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST2021-02-05T05:01:55+5:302021-02-05T05:01:55+5:30

पुणे : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व उत्कर्षासाठी स्थापन झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी भाषा संवर्धनासाठी स्वतंत्र केंद्र पुणे ...

Meeting for establishment of Marathi Language Center in the University | विद्यापीठात मराठी भाषा केंद्र स्थापनेसाठी बैठक

विद्यापीठात मराठी भाषा केंद्र स्थापनेसाठी बैठक

पुणे : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व उत्कर्षासाठी स्थापन झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी भाषा संवर्धनासाठी स्वतंत्र केंद्र पुणे सुरू व्हावे, अशी अनेकांची इच्छा आहे. त्यासाठी मराठी भाषा संवर्धन मंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक आयोजित करून मराठी भाषा केंद्र स्थापनेवर चर्चा केली जाईल, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विभागाचे रूपांतर विविध संकुलात केले आहे. मराठी विभागाचा समावेश स्कूल ऑफ इंडियन लॅग्वेजमध्ये केला आहे. मात्र, मराठी विभागाला स्वतंत्र संकुलाचा दर्जा द्यावा, अशी मागणी विविध घटकांकडून व्यक्त केली जात आहे.‘लोकमत’ने या प्रश्नाला वाचा फोडली होती. त्यावर रविवारी उदय सामंत यांनी सुभाष देसाई यांच्याशी चर्चा केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी सांगितले.

Web Title: Meeting for establishment of Marathi Language Center in the University