शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

बैलगाडा शर्यतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार

By admin | Published: January 25, 2017 11:43 PM

तमिळनाडूत जशी जलीकट्टूला परवानगी मिळाली तशीच महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना मिळावी, अशी भूमिका शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी घेतली आहे.

मंचर : तमिळनाडूत जशी जलीकट्टूला परवानगी मिळाली तशीच महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना मिळावी, अशी भूमिका शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी घेतली आहे. त्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती खासदार आढळराव-पाटील यांनी दिली.तमिळनाडूच्या धर्तीवर राज्यातही बैलगाडीच्या शर्यतींना पाठिंबा देणार असून, २७ तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत बजेटवरील चर्चेतही हा मुद्दा मांडू, असे आढळराव-पाटील म्हणाले. यूपीए सरकारने आणि भाजपाने यात रस दाखवला नाही. प्रकाश जावडेकर यांनी तीन वर्षांत काहीही केले नाही. गेली ३ वर्षे मी बैलगाडा शर्यतीबाबत लोकसभेत आवाज उठवला. राज्यपालांच्या वटहुकमाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येऊ शकते. अध्यादेशात तरतूद करावी किंवा राष्ट्रपतींद्वारे वटहुकूम काढावा, असे शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी नमूद केल. बैलगाडी शर्यतीवर बंदी असून शर्यतीदरम्यान बैलांवर अत्याचार होतात. त्यांना कू्ररपणे वागवले जात असल्यामुळे केंद्र सरकारने जुलै २०११मध्ये अध्यादेश काढून प्राण्यांच्या शर्यतींवर बंदी घातली.त्यामुळे बैलगाडीच्या शर्यतीवरील बंदी आली. हा वाद पुढे कार्टात गेला सर्वोच्च न्यायालयाने प्राणीप्रेमींच्या बाजूने निकाल देऊन शर्यतीवर बंदी घातली. मग दोन वर्षांपूर्वी बैलगाडा शर्यतीवरील हायकोर्टाने घातलेली बंदी सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवली होती. दरम्यान मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली होती. राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जावडेकरांकडे केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने ही बंदी कायम ठेवून सरकारला धक्का दिला. तमिळनाडूत जशी जलीकट्टूला परवानगी मिळाली, तशीच महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना मिळावी, अशी मागणी आढळराव-पाटील यांनी केली. या संदर्भात शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी नमूद केले. (वार्ताहर)