दोन अल्पवयीन मुलांकडून अडीच लाखांचे एमडी जप्त; कॅम्प परिसरातून घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:22 IST2026-02-05T18:22:29+5:302026-02-05T18:22:40+5:30

रस्त्याच्या कडेला उभे असताना दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली होती

MD worth Rs 2.5 lakh seized from two minors; taken into custody from camp area | दोन अल्पवयीन मुलांकडून अडीच लाखांचे एमडी जप्त; कॅम्प परिसरातून घेतले ताब्यात

दोन अल्पवयीन मुलांकडून अडीच लाखांचे एमडी जप्त; कॅम्प परिसरातून घेतले ताब्यात

पुणे: एमजी रोड कॅम्प परिसरातील एका शाळेसमोर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ लाख ६० हजार रुपये किमतीचे १३ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. दोघांनी एमडी नशा करण्यासाठी स्वतःजवळ बाळगले असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी, पोलिस हवालदार विशाल दळवी यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक मंगळवारी (दि. ३) रात्री पावणे आठच्या सुमारास गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना रस्त्याच्या कडेला उभे असलेले दोन संशयित तरुण कोणाची तरी वाट पाहत असल्याचे दिसून आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली. चौकशीत दोघांचे वय १८ वर्षांखालील असल्याचे निष्पन्न झाले. तपासणीदरम्यान त्यांच्याकडून पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली. फील्ड टेस्ट किटद्वारे तपासणी केली असता ते एमडी असल्याचे स्पष्ट झाले. इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याने वजन केल्यावर त्याचे एकूण वजन सुमारे १३ ग्रॅम असल्याचे आढळले. पुढील तपासासाठी हा नमुना फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अल्पवीयन मुलांना हा अंमली पदार्थ कोणी पुरवला, याचा पोलिस तपास करत आहेत.

Web Title : पुणे: कैंप इलाके में ढाई लाख रुपये की एमडी के साथ नाबालिग गिरफ्तार

Web Summary : पुणे पुलिस ने कैंप इलाके के एक स्कूल के पास से दो नाबालिगों को 2.5 लाख रुपये की एमडी के साथ गिरफ्तार किया। किशोरों ने नशीली दवाओं को निजी इस्तेमाल के लिए रखने की बात कबूल की। मादक पदार्थों के स्रोत का पता लगाने के लिए जांच जारी है।

Web Title : Pune: Minors Caught with MD Worth ₹2.5 Lakh in Camp

Web Summary : Pune police seized ₹2.5 lakh worth of MD from two minors near a Camp school. The teens admitted possessing the drug for personal use. An investigation is underway to determine the source of the narcotics.