शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

माऊलींची पालखी दर्शनबारीतच उतरणार

By admin | Updated: July 4, 2015 00:01 IST

माऊलींची पालखी दर्शनबारीतच उतरविण्याचा निर्णय देवस्थान प्रशासनाने घेतला आहे. मात्र, तेथे काही अघटित घडले तर त्याची जबाबदारी ते घेणार का, असा सवालही होत आहे.

बापू बैैलकर, पुणेमाऊलींची पालखी दर्शनबारीतच उतरविण्याचा निर्णय देवस्थान प्रशासनाने घेतला आहे. मात्र, तेथे काही अघटित घडले तर त्याची जबाबदारी ते घेणार का, असा सवालही होत आहे. तेथे गर्दीमुळे चेंगराचेंगरी होण्याची भीत आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शनबारीत याचे नियोजनच केले नसल्याने हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सोहळ्याला अवघे सहा दिवस राहिले असताना हा प्रश्न आहेच.आळंदी देवस्थानच्या वतीने सुमारे पाच कोटी रुपये खर्चून वारकऱ्यांच्या सोयीसाठी पूर्वीच्या गांधीवाड्याच्या ठिकाणी दर्शनबारी उभी राहिली आहे. या ठिकाणी यापूर्वी आजोळघरी पालखी आल्यानंतर पूजेची प्रथा आहे. येथे पालखी उतरवली जायची. मात्र नवीन बांधकामात पालखीसाठीच्या नियोजनाचाच विसर देवस्थानला पडला गेला. देवस्थानतर्फे दर्शनबारीत प्रवेशद्वारावर कट्टा बांधून मोकळ्या जागेत शेड बांधण्यात येणार आहे. मागे हॉलमध्ये दिंड्या व पूजाअर्चा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र तेथे जर पालखी उतरवली तर अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत पावसाळा सुरू आहे. शिवाय पालखीचे प्रस्थान रात्रीच्या वेळी ९ वाजता होणार आहे. आजोळघरी पालखीची पूजा, त्यानंतर महानैवेद्य, समाज आरती, रात्रीचा जागर असे प्रमुख कार्यक्रम याच ठिकाणी होतात, अशा वेळी वारकरी, दिंडीकरी, इतर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे त्या अपुऱ्या जागेत चेंगराचेंगरी होण्याचा धोका संभवतो. त्यात जर या कालावधीत मोठा पाऊस आला तर वारकरी दर्शनबारीत घुसू शकतात. अजून दर्शनबारीचे काम अपूर्ण आहे. या कामाच्या सक्षमतेचा दाखलाही अजून देवस्थान प्रशासनाने घेतला नाही. त्यामुळे इमारतीलाही धोका संभवू शकतो. पालखीबरोबर साधारण दीड ते दोन हजार भाविक असतात. त्यात दर्शनासाठीही वारकरी शिरकाव करू शकतात. यामुळे मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दर्शनबारीतील मधला जिना काढायचा हा एक कायमस्वरूपी पर्याय समोर आला आहे. मात्र त्या बांधकामाची रचना करताना हा जिना करण्यात आला आहे. आरसीसी बांधकाम असल्याने जर तो हलवला तर बांधकामालाही धोका संभवू शकतो. पालखी सोहळा सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. खेडचे प्रांताधिकारी हिंमतराव खराडे यांच्याशी संपर्क साधला असता, देवस्थान, विश्वस्त, मालक व चोपदार यांच्याशी चर्चा झाली असून, पालखी तेथेच उतरवायचा त्यांचा निर्णय झाला आहे. ती कुठे उतरावयाची हा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. मात्र त्यांना प्रशासनाचे लागणारे सर्व सहकार्य करू. मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक औंधकर म्हणाले, की प्रशासनाचे त्यांना पूर्ण सहकार्य राहील. मात्र, तेथे बांधकाम चालू आहे. आम्हाला बांधकाम सक्षमतेसाठी कोणीही मागणी केली नाही. त्यामुळे तेथे पालखी उतरल्यास जे प्रश्न निर्माण होतील, याबाबत बोलू शकत नाही. हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. जेथे पालखी उतरवायची ते विचार करताहेत ती जागा अपुरी पडणार आहे. जर तेथे कोणता अघटित प्रकार घडला तर देवस्थान त्याची जबाबदारी घेणार का? असा सवाल करीत परंपरा मोडू नये ही माझी माफक अपेक्षा आहे. उद्या पालखी दुसरीकडे उतरली तर तोच पायंडा पडेल. या लोकांना दर्शनबारी करताना माऊलींचा विसरच पडला कसा? - बाळासाहेब आरफळकर, मालक दर्शनबारीत पालखीचे नियोजन न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. १0- १५ दिवसांपूर्वी हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता हा पेच सुटला आहे. त्यामुळे आता काहीच अडचण नाही. पालखी येथे उतरवणे ही परंपरा आहे. वारकऱ्यांची येथे श्रद्धा आहे. त्यामुळे दुसरा पर्याय योग्य नाही. येथेच सर्वांनी नियोजन करून व प्रशासनाने मदत करून सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी मदत केली पाहिजे.अवधूत गांधी, गांधीवाड्याचे मालक