शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: January 19, 2015 00:04 IST

लग्नात मानपान व्यवस्थित केला नाही आणि माहेरहून २ लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ केल्याची घटना येथे घडली.

राजगुरुनगर : लग्नात मानपान व्यवस्थित केला नाही आणि माहेरहून २ लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ केल्याची घटना येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी पती, सासू, दीर, आणि जाऊ या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांडोली (ता. खेड) येथील मुलीचा २०११ साली भोसरी येथील संतोष वसंत गायकवाड याच्याबरोबर विवाह झाला होता. मात्र, सासरच्या लोकांचा लग्नात व्यवस्थित मानपान केला नाही, लग्नात जेवण नीट केले नाही आणि चांगला हॉल घेतला नाही म्हणून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करीत होते. तिला आई वडिलांनी लग्नात ७ तोळे दागिने दिले होते. मार्च २०१२ मध्ये सासूने ते दागिने काढून घेतले आणि तिला माहेरी सोडून दिले. त्यानंतर काही दिवसांनी ती सासरी गेली असता, तुला नांदायचे असल्यास माहेरून २ लाख रुपये घेऊन ये असे सांगितले आणि धक्काबुक्की, शिवीगाळ, दमदाटी केली. सासरच्या या जाचाला कंटाळून विवाहितेने पोलिसात फिर्याद दिली. म्हणून सासरच्यांनी शारीरिक, मानसिक त्रास दिला आणि जाचहाट केला अशी फिर्याद फिर्यादीने दिली आहे. यावरून पोलिसांनी सासू पद्मा, नवरा संतोष, दीर उमेश, जाऊ रोहिणी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)