शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आकाशदिव्यांच्या प्रकाशाने उजळली बाजारपेठ

By admin | Updated: November 8, 2015 03:01 IST

अंगणात लागणाऱ्या आकाशदिव्यांनी दिवाळीचा सण ओळखला जातो. शहरातील बाजारपेठ आकाशदिव्यांच्या प्रकाशाने उजळली आहे. यंदा आकाशकंदिलाच्या बाजारपेठेत चायनाचे

बारामती : अंगणात लागणाऱ्या आकाशदिव्यांनी दिवाळीचा सण ओळखला जातो. शहरातील बाजारपेठ आकाशदिव्यांच्या प्रकाशाने उजळली आहे. यंदा आकाशकंदिलाच्या बाजारपेठेत चायनाचे वर्चस्व जाणवत आहे. याशिवाय बाजारपेठेत बांबूंच्या चटईचे आकाशकंदील विशेष आकर्षण ठरले आहेत. प्लॅस्टिकच्या रंगीबेरंगी कागदांची असणारी चांदणी केव्हाच हद्दपार झाली आहे. बांबूंच्या काड्या आणि प्लॅस्टिकच्या रंगीत कागदामध्ये केली जाणारी ही चांदणी दिवाळीत अंगणामध्ये आसमंत उजळत असे. आता या चांदणीची जागा हंडी, कलाकुसरीचे आकाशकंदील, कापडी आकाशकंदील यांनी घेतली आहे. बाजारात पन्नास रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत आकाशकंदील विक्रीला उपलब्ध आहेत. हंडी, डबल हंडी, कमळ, अष्टकोनी आकाशकंदिलांसह शंभरहून अधिक प्रकारचे आकाशकंदील बाजारात विक्रीला उपलब्ध आहेत. कापडी आकाशकंदील, बांबूचे आकाशकंदील यंदा ग्राहकांमध्ये आकर्षण ठरले आहेत.८०० रुपयांपर्यंत हे आकाशकंदील आहेत. दिवाळी संपल्यानंतर, हे आकाशकंदील घडी घालून जपून ठेवता येतात. त्यामुळे त्यांना अधिक मागणी असल्याचे विक्रेते अमोल तापकिरे यांनी सांगितले.