शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
2
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
3
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
4
कोहली-ऋतुराजचा शतकी धमाका; KL राहुलचं अर्धशतक! टीम इंडियानं द. आफ्रिकेसमोर ठेवलं ३५९ धावांचे लक्ष्य
5
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
6
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
7
मायेचं नातं! १२ वर्षांनंतर मुलीने पहिल्यांदाच ऐकला आईचा आवाज; डोळे पाणावणारा Video
8
तुमचे पैसे SBI, HDFC किंवा ICICI बँकेत असेल तर खुशखबर! RBI ने 'या' ३ बँकांसाठी केली मोठी घोषणा
9
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
10
ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली...
11
५ मुलांची आई भंगारवाल्याच्या प्रेमात पडली! वयाचाही विचार केला नाही; पतीसमोर बांधली दुसरी लग्नगाठ
12
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
13
काय सांगता? फक्त स्वत:ला पाहण्यासाठी नाही तर 'या' कारणांसाठी लिफ्टमध्ये असतो आरसा
14
सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा
15
अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे
16
"कपडे घालून या नाहीतर गोळ्या घालू..."; जैन मुनींशी गावगुंडाचे असभ्य वर्तन, समाज संतप्त
17
श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड राहुल मोदीला हाताने भरवली 'जापानी डिश', व्हिडीओ व्हायरल
18
दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय? 
19
Gold Silver Price Today: चांदी ऑल टाईम 'हाय'वर; सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदी करणार असाल तर खिसा करावा लागेल रिकामा
20
'मुंबई इंडियन्स'ने संघात घेताच कर्णधार शार्दुल ठाकूरचा धमाका; ७ चेंडूत घेतले ४ बळी
Daily Top 2Weekly Top 5

मराठी माणसेच शनिवारवाडा आणि पेशवाईला विसरून गेलेत ; उदयसिंह पेशवा यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 18:48 IST

बाकीच्या वास्तूंवर ज्याप्रमाणे सरकार खर्च करते आहे. तसेच शनिवारवाड्याची डागडुजी करून त्यावर देखील खर्च केला पाहिजे. आता मराठी माणसेच शनिवारवाडा आणि पेशवाईला विसरून गेले आहेत,अशी खंत पेशवे वंशज उदयसिंह पेशवा यांनी व्यक्त केली. 

पुणे: बाकीच्या वास्तूंवर ज्याप्रमाणे सरकार खर्च करते आहे. तसेच शनिवारवाड्याची डागडुजी करून त्यावर देखील खर्च केला पाहिजे. आता मराठी माणसेच शनिवारवाडा आणि पेशवाईला विसरून गेले आहेत,अशी खंत पेशवे वंशज उदयसिंह पेशवा यांनी व्यक्त केली. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवार वाड्याच्या २८८ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार वाड्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. तसेच ऐतिहासिक शनिवार वाड्याचा इतिहास मनात आठवत असतानाच  शनिवार वाड्याचा दिल्ली दरवाजा पुणेकर आणि पर्यटकांसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला.

याप्रसंगी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ मोहन शेटे उपमहापौर सरस्वती शेंडगे, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर, उदय वाडदेकर, अनिल नेने, प्रकाश दाते, मकरंद माणकीकर, उमेश देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे व श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली.

पेशवा म्हणाले, ऐतिहासिक वास्तूत  सुधारणा झाली तर जास्तीत जास्त पर्यटक शनिवारवाड्याला भेट देतील. या वास्तुकडे लक्ष देणे सरकारचे काम आहे. शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तू महाराष्ट्राचे भूषण आहे.वाड्याचे वरच्या भागातील लाकूड काम पडण्याच्या अवस्थेत आहे. तसेच या दिल्ली दरवाज्याची अवस्था फारच बिकट आहे. सरकारने शनिवारवाड्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने अशी अवस्था झाली आहे. मुख्यमंत्र्यांची खुर्ची ही पेशव्यांची आहे हे लक्षात ठेवावे. आम्ही शनिवारवाड्याच्या सुधारणेबाबत कोणालाही भेटणार नाही. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन याबाबत विचार करावा.

मोहन शेटे म्हणाले, या जागेवर १० जानेवारी १७३० रोजी भूमीपूजन झाले होते आणि त्यानंतर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवार वाड्याची वास्तूशांत झाली. अनेक वर्षांनी हा दिल्ली दरवाजा उघडण्यात आला आहे आणि अनेक आठवणी मनात येत आहेत. शनिवार वाड्यासारख्या भव्य वास्तू महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अनेक असतील परंतु या वास्तुसमोर जो पराक्रम घडला आहे, त्या पराक्रमाची तुलना करता येणार नाही. सतत ८० वर्ष भारतावर प्रभुत्व निर्माण करण्याचे काम या वाड्याने केले होते, ही अभिमानाची गोष्ट आहे. आज पानिपतच्या रणसंग्रामाची देखील आठवण होत आहे. पानिपतच्या युध्दात मराठे लढले, आपल्या मातीची लाज राखण्यासाठी.छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी. अशा पराक्रमाचा इतिहास या वाड्याला लाभलेला आहे.

टॅग्स :shanivar wadaशनिवारवाडाhistoryइतिहासGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्रPeshwaiपेशवाई