शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

बनावट वायरची निर्मिती व विक्री करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:13 IST

पुणे : पॉलिकॅब कंपनीच्या नावाने बनावट इलेक्ट्रिक वायर बनविणारे व ती विक्रीसाठी मागविणाऱ्यांमधील महत्त्वाच्या वाहतूकदारास फरासखाना पोलिसांनी अटक केली ...

पुणे : पॉलिकॅब कंपनीच्या नावाने बनावट इलेक्ट्रिक वायर बनविणारे व ती विक्रीसाठी मागविणाऱ्यांमधील महत्त्वाच्या वाहतूकदारास फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.

रमेशकुमार अमरसिंग कोंडल (वय ४६, रा. हडपसर, मूळ रा. हिमाचल प्रदेश) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात पूर्वी दिनेशसिंग रुपसिंग राजपुरोहित (वय ४२, रा. शुक्रवार पेठ) याला अटक केली आहे. विनोदकुमार श्रीजयचंद करपासिया (वय ३९, रा. दिल्ली) यांनी फिर्याद दिली आहे. राजपुरोहितच्या गोडाऊनवर छापा टाकून बनावट वायर, पॅकिंगसाठी लागणारे कंपनीच्या नावाचे बॉक्‍स व अन्य साहित्य असा ४३ लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. या गुन्ह्यात एकूण तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चार वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. वायर, गॅस शेगडी, रेग्युलेटर, एलपीजी गॅस पाइप आणि कुकर अशा बनावट मालाची आरोपी वाहतूक करत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. त्या अनुषंगाने कोंडलकडे चौकशी करायची आहे. अधिकृत कंपनी वायर व बॉक्स वेगवेगळे पाठवत नाही, हे माहिती असतानाही कोंडल याने त्याच्या ट्रान्सपोर्टच्या मदतीने त्या मालाची वाहतूक केली. त्यामुळे त्याला पोलीस कोठडी देण्याचा युक्तिवाद सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने आरोपीची चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.