शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

एनडीएत प्रशिक्षणादरम्यान मालदिवच्या कॅडेटचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:13 IST

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) शनिवारी प्रशिक्षणादरम्यान एका कॅडेटचा मृत्यू झाला. हा कॅडेट मालदिव येथील असून एनडीएत सुरू ...

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) शनिवारी प्रशिक्षणादरम्यान एका कॅडेटचा मृत्यू झाला. हा कॅडेट मालदिव येथील असून एनडीएत सुरू असलेल्या ‘जोश रन’ दरम्यान ही घटना घडली. कॅडेट मोहम्मद सुलतान अहमद (वय २१) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत शनिवारी जोश रनचे आयोजन करण्यात आले होते. १२ किमी धावण्याची ही स्पर्धा होती. यात मोहम्मद सहभागी झाला होता. धावताना त्याला चक्कर आल्यासारखे वाटले आणि तो कोसळला. त्याला तातडीने एनडीएच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची माहिती झोन ३ च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दिली. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समजू शकणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

माेहम्मद हा १२ मार्चला एनडीएच्या १४५ व्या तुकडीत दाखल झाला होता. या प्रकरणी एनडीए प्रशासनातर्फे चाैकशी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती एनडीए प्रशासनाने दिली. तसेच मालदिव वकिलातीलाही याची माहिती देण्यात आली आहे. त्याच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहितीही एनडीए प्रशासनाने दिली. दरम्यान, याप्रकरणी उत्तम नगर पोलीस ठाण्यात कलम १७४ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.