शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक झाल्याने भरपाई द्या

By admin | Updated: January 20, 2015 00:48 IST

बँकाना ४४ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश राज्याचे माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश अगरवाल यांनी दिला आहे.

पुणे : आॅनलाईन बँकिंगद्वारे पुण्यातील एका कंपनीची ८० लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी संबंधित रक्कम हस्तांतरित झालेल्या बँकाना ४४ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश राज्याचे माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश अगरवाल यांनी दिला आहे. सुरक्षेसाठी बँकांना घालून दिलेले केवायसी नॉर्म पाळण्याची वेळीच काळजी न घेतल्याने तसेच वोडाफोन कंपनीने नवे सिमकार्ड देतानाही कागदपत्रांची पाहणी न केल्याचा बँक व सिमकार्ड कंपनीला भुर्दंड बसला आहे.या प्रकरणी धनलक्ष्मी बँकेने १८ लाख, एसबीआय बँकेने २ लाख, एसबीआय पटियाला बँकेने ७.५ लाख, पंजाब नॅशनल बँकेने ७ लाख आणि वोडाफोन कंपनीने फिर्यादीला १० लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, असा निकाल देण्यात आला आहे. याप्रकरणी सुहास एंटरप्रायझेसतर्फे सुहास मानकामे यांनी फिर्याद दाखल केली होती. फियार्दीतर्फे अ‍ॅड. गौरव जाचक यांनी माहिती तंत्रज्ञान सचिवांपुढे दावा दाखल केला होता.सुहास एंटरप्रायझेसचे बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये एक कोटी रुपयांचे कॅश क्रेडीट अकाऊंट होते. आॅनलाईन बँकिंगद्वारे फसवणूक करून त्यांच्या खात्यातून ७९ लाख २७ हजार रुपये काढून घेण्यात आले होते. त्यातील ३१ लाख २६ हजार रुपयांची रक्कम बँकेकडे तक्रार करण्यात आल्यानंतर लगेच गोठविण्यात आली होती.फिर्यादी यांच्या खात्यातून फसवून काढून घेण्यात आलेली रक्कम जयपूर, लखनौ, गाझियाबाद येथील बँकांमध्ये वर्ग झाली होती. (प्रतिनिधी)४फसवणूक करून काढून घेण्यात आलेली रक्कम परत मिळावी म्हणून फिर्यादी यांनी दावा दाखल केला होता. बँकेने फियार्दीच्या खात्यातून रक्कमेच्या सुरक्षेसाठी बँकांना घालून दिलेले केवायसी नॉर्मस पाळले नाहीत. तसेच वोडाफोन कंपनीने नवे सिमकार्ड देताना कागदपत्रांची पाहणी केली नाही, असा युक्तिवाद अ‍ॅड. जाचक यांनी केला.