शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

महाविकास आघाडीचे नेते व मंत्र्याकडून रेस ट्रॅकवर गाडी पार्किंग करण्याचा प्रकार निषेधार्ह: प्रविण दरेकरांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 8:25 PM

ट्रॅकवरून गाड्या नेणे म्हणजे खेळाडूंसाठींच्या पवित्र वास्तूचा अवमान करण्यासारखं आहे.

पुणेबालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात धावपटूंसाठी तयार केलेल्या सिंथेटिक रेस ट्रॅकवर व्हीआयपी गाड्या नेेण्यासह पार्क करण्यावरुन क्रीडा क्षेत्रासह सर्वच स्तरावरून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. त्यात भाजपही आघाडीवर आहे. आता विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी याच प्रकारावरून टीकेची झोड उठविली आहे. 

राज्यातील क्रीडा संकुलांची देखभाल नीट करण्याची गरज असताना महाविकास आघाडी मधील नेते व मंत्री पुणे येथील शिवछत्रपती क्रिडा संकुलातील रेस ट्रॅकवर गाड्या उभ्या करून खेळाडूंच्या भविष्याचा ट्रॅक उद्ध्वस्त करत आहेत, त्यांची ही कृती निषेधार्ह आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.  

दरेकर म्हणाले, राज्यात अगोदरपासूनच क्रीडा सुविधा कमी आहेत त्यामुळे त्या ट्रॅकची नासधूस करू नये. रेस ट्रॅकवर व्हीव्हीआयपी गाड्या आणताना काळजी घेण्याची आवश्यकता होती. महाराष्ट्रात स्पोर्ट्सचं वैभव आहे. त्या ट्रॅकवर स्पर्धक ऑलिंपिकसाठी सराव करतात, स्वतःचे आणि देशाचे भविष्य घडवत असतो. महाविकास आघाडी सरकारकडून एक दीड वर्षात स्पोर्ट्सला चालना देण्यात आली नाही.ट्रॅकवरून गाड्या नेणे म्हणजे खेळाडूंसाठींच्या पवित्र वास्तूचा अवमान करण्यासारखं आहे. त्यामुळे या प्रकाराचा मी निषेध व्यक्त करतो,अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली.

...संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हावी; भाजपचं निवेदन क्रीडा संकुलातील हे ट्रॅक अतिशय कुशलतेने बनवल्या जातात व त्यांची नियमित काळजी घ्यावी लागते. तसेच ह्या ट्रॅकविषयी क्रीडापटुंच्या मनामध्ये आपुलकीची भावना असते. क्रीडापटूंच्या भावनांची थट्टा उडविणारे हे कृत्य करणाऱ्या नेत्यांचा व त्यांच्या या कृतीचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचप्रमाणे या नेत्यांच्या उद्दामपणामुळे या सिंथेटिक ट्रॅक चे झालेले नुकसान हे संबंधित नेत्यांकडून वसूल करण्यात यावे व ट्रॅकपर्यंत नेत्यांच्या गाड्यांना सोडणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हावी अशा मागणीचे निवेदन क्रीडा संकुलात देण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेPraveen Darekarप्रवीण दरेकरBalewadiबालेवाडीSunil Kedarसुनील केदारSharad Pawarशरद पवारBJPभाजपा