देशातील गुन्हेगारीत महाराष्ट्र आठव्या स्थानी; महिलांवरील अत्याचार वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 11:27 AM2021-03-20T11:27:38+5:302021-03-20T11:28:10+5:30

महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे घडण्याचे प्रमाण अमरावती शहरात नोंदवले गेले आहे.

Maharashtra ranks eighth in crime in the country; Violence on women increased | देशातील गुन्हेगारीत महाराष्ट्र आठव्या स्थानी; महिलांवरील अत्याचार वाढले

देशातील गुन्हेगारीत महाराष्ट्र आठव्या स्थानी; महिलांवरील अत्याचार वाढले

Next

पुणे : पुरोगामी महाराष्ट्रात २०१९ मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची बाब राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) प्रकाशित करण्यात आलेल्या ‘क्राइम इन महाराष्ट्र २०१९’ या अहवालातून समोर आली आहे. २०१९ मध्ये खून, दरोडा, मालमत्तेविरोधातील गुन्ह्यात घट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे म्हटले आहे. अहवालानुसार देशातील गुन्हेगारीत महाराष्ट्र आठव्या स्थानी आहे.

राज्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणाचा आढावा तसेच वास्तव मांडणाऱ्या ‘क्राइम इन महाराष्ट्र २०१९’ या अहवालाचे प्रकाशन राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. विशेष महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील, पोलीस अधीक्षक अशोक धिवरे, पल्लवी बर्गे, संभाजी कदम, अतिरिक्त अधीक्षक आरती‌ बनसोडे उपस्थित होते.

देशात २०१९ मध्ये‌ ३२ लाख २५ हजार ७०१ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ३ लाख ४१ हजार ८४ गुन्हे महाराष्ट्रातील आहेत. २०१९ मध्ये राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात ४.५४ टक्क्यांनी वाढ झाली असून सर्वाधिक‌ गुन्हे मुंबई शहरात दाखल आहेत. २०१९ मध्ये मुंबई शहरात महिलांवरील अत्याचाराचे ६ हजार ५१९ गुन्हे दाखल आहेत, असे अहवालात म्हटले आहे. 

----------

महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे घडण्याचे प्रमाण अमरावती शहरात नोंदवले गेले आहे. तेथील गुन्ह्यांच्या आकडेवारीचे प्रमाण १४२.५५ टक्के  आहे. २०१८ च्या तुलनेत‌ २०१९ मध्ये अनुसूचित जमातींवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये ८.९२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये दखलपात्र गुन्हे सिद्ध करण्याचे

प्रमाण ४८.९५ टक्के होते. २०१९ मध्ये राज्यात १८ हजार ९१६ जणांनी आत्महत्या केल्या. 

१४ हजार ६०८ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. जबरी चोरीच्या गुन्ह्यात ४.४८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे हा अहवाल सांगतो. २०१९ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत ८९१ गुन्हे दाखल झाले आहेत.

---

चौकट

गुन्हे       २०१८                            २०१९

खून       २, १९९                          २, १४२

दरोडा      ७६९                             ६१५

जबरी चोरी    ७,४३०                     ७,७६३

मालमत्तेचे गुन्हे   १, ३१, ५९७        १, २२, ८४६

महिलांवरील अत्याचार  ३५, ५०१   ३७, ११२

अनुसूचित जाती      १,९७४            २,१५०

अनुसूचित जमाती        ५२६               ५५९

एकूण गुन्हे            ३, ४६, २९१      ३,४१, ८४

----

पुणे : पुरोगामी महाराष्ट्रात २०१९ मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची बाब राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) प्रकाशित करण्यात आलेल्या ‘क्राइम इन महाराष्ट्र २०१९’ या अहवालातून समोर आली आहे. २०१९ मध्ये खून, दरोडा, मालमत्तेविरोधातील गुन्ह्यात घट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे म्हटले आहे. अहवालानुसार देशातील गुन्हेगारीत महाराष्ट्र आठव्या स्थानी आहे. राज्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणाचा आढावा तसेच वास्तव मांडणाऱ्या ‘क्राइम इन महाराष्ट्र २०१९’ या अहवालाचे प्रकाशन राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. विशेष महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील, पोलीस

अधीक्षक अशोक धिवरे, पल्लवी बर्गे, संभाजी कदम, अतिरिक्त अधीक्षक आरती‌ बनसोडे उपस्थित होते.

 देशात २०१९ मध्ये‌ ३२ लाख २५ हजार ७०१ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ३ लाख ४१ हजार ८४ गुन्हे महाराष्ट्रातील आहेत. २०१९ मध्ये राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात ४.५४ टक्क्यांनी वाढ झाली असून सर्वाधिक‌ गुन्हे मुंबई शहरात दाखल आहेत. २०१९ मध्ये मुंबई शहरात महिलांवरील अत्याचाराचे ६ हजार ५१९ गुन्हे दाखल आहेत, असे अहवालात म्हटले आहे. 

----------

महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे घडण्याचे प्रमाण अमरावती शहरात नोंदवले गेले आहे. तेथील गुन्ह्यांच्या आकडेवारीचे प्रमाण १४२.५५ टक्के  आहे. २०१८ च्या तुलनेत‌ २०१९ मध्ये अनुसूचित जमातींवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये ८.९२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये दखलपात्र गुन्हे सिद्ध करण्याचे

प्रमाण ४८.९५ टक्के होते. २०१९ मध्ये राज्यात १८ हजार ९१६ जणांनी आत्महत्या केल्या. 

१४ हजार ६०८ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. जबरी चोरीच्या गुन्ह्यात ४.४८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे हा अहवाल सांगतो. २०१९ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत ८९१ गुन्हे दाखल झाले आहेत.

---

चौकट

गुन्हे       २०१८               २०१९

खून       २, १९९              २, १४२

दरोडा      ७६९                  ६१५

जबरी चोरी    ७,४३०              ७,७६३

मालमत्तेचे गुन्हे   १, ३१, ५९७     १, २२, ८४६

महिलांवरील अत्याचार  ३५, ५०१   ३७, ११२

अनुसूचित जाती      १,९७४            २,१५०

अनुसूचित जमाती        ५२६               ५५९

एकूण गुन्हे            ३, ४६, २९१      ३,४१, ८४

----

Web Title: Maharashtra ranks eighth in crime in the country; Violence on women increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.