शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

Maharashtra Lockdown : राज्य सरकारकडून प्रवासासाठी पुन्हा एकदा 'ई-पास'; पहिल्याच दिवशी पुण्यात २ हजारांवर अर्ज विनंती अर्ज  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 20:02 IST

पोलीस आयुक्त कार्यालय येथे डिजीटल कक्ष कार्यान्वित

 पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने ’ब्रेक दि चेन’अंतर्गत असणारे निर्बंध अधिक कडक केले असून, प्रवासावर देखील कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. हे नियम 1 मे पर्यंत लागू करण्यात आले आहेत. या दरम्यान राज्यातील जनतेची गैरसोय होऊ नये याकरिता राज्य शासनाने एका जिल्हयातून दुस-या जिल्ह्यात तसेच पुणे शहरातून इतर जिल्हयात जाण्याकरिता https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर ’ई-पास’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुण्यातील पोलीस आयुक्त कार्यालय येथे शुक्रवार (दि.23) पासून शहर पोलीस दलांकडून ई- पास देण्याकरिता डिजीटल कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 2077 इतके विनंती अर्ज ई-पास साठी क्षाकडे प्राप्त झाले असून, त्यापैकी 286 नागरिकांना डिजीटल पास देण्यात आले आहेत तर 375 नागरिकांची आवश्यक कागदपत्रे नसल्याने नाकारण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा डिजीटल कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या डिजीटल कक्षामध्ये 1 पोलीस निरीक्षक, 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 2 पोलीस उपनिरीक्षक आणि 20 पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांना काही महत्त्वाच्या कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास नागरिकांनी ई- पासचा वापर करावा, असे आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------जाणून घ्या कसा काढावा ई-पास* ई- पास मिळवण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.*  त्यानंतर 'apply for pass here'   या पयार्यावर क्लिक करा.* ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडावा.* आवश्यक कागदपत्र जोडावीत.* प्रवास करण्यासाठीचे अत्यावश्यक कारणही तेथे नमूद करावे लागेल.* कागदपत्रे अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊनतो अपलोड करावा.* अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करावा,त्यावरून अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता.थोडक्यात या माध्यमातून तुम्हाला अजार्चं स्टेटस तपासता येईल.* पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकनआयडी वापरुन इ- पास डाऊनलोड करु शकता.*ई- पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासची वैधता कालावधी आणिक्यूआर कोड असेल.* प्रवास करतेवेळी पासची मूळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत ठेवा.जेणेकरुन पोलिसांनी विचारल्यानंतर पास दाखविता येऊ शकेल.----------------------------------------------कुणाला मिळू शकतो ई-पास*अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणिअत्यावश्यक आरोग्य आणीबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.*अत्यावश्यक सेवांतील कर्मचा-्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गतप्रवासासाठी ई- पासची आवश्यकता नाही.*व्यावसायिक कारणांसाठी परवानगी देण्यात येणार नाही.*विमान प्रवास करणा-या नागरिकांना प्रवास करण्याकरिता डिजी़टल पास देण्यात येईल.* ज्यांना ऑनलाईन सेवेसाठीचा अ‍ॅक्सेस मिळत नाही, अशा व्यक्तींनी सदरप्रक्रियेसाठी नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी. जिथे त्यांची मदतकेली जाईल.---------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेTravel Tipsट्रॅव्हल टिप्सPoliceपोलिसState Governmentराज्य सरकार