शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

Maharashtra Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट - हडपसर मतदारसंघातील मतविभाजनाचा लाभ कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 13:36 IST

हडपसर विधानसभा मतदारसंघात मराठा-माळी मतदारांचे वर्चस्व आहे. तर गेल्या काही वर्षांत आयटी क्षेत्राच्या विकासामुळे कॉस्मोपॉॅलिटन मतदार देखील वाढत आहेत.

ठळक मुद्देमताधिक्य राष्ट्रवादी टिकवणार का ?

- सुषमा नेहरकर-शिंदे हडपसर विधानसभा मतदारसंघात मराठा-माळी मतदारांचे वर्चस्व आहे. तर गेल्या काही वर्षांत आयटी क्षेत्राच्या विकासामुळे कॉस्मोपॉॅलिटन मतदार देखील वाढत आहेत. भाजपचे योगेश टिळेकर, राष्ट्रवादीचे चेतन तुपे आणि मनसेचे वसंत मोरे यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होत असून, या तिरंगी लढतीचा लाभ कुणाला होणार यावर निवडणुकीची गणिते अवलंबून राहणार आहेत.शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या हडपसर विधानसभा मतदार संघात शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही मतदारांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे व मोदी-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपले सरकार हाच टिळेकरांच्या प्रचाराचा मुद्दा आहे. तर मतदारसंघातील वाहतूक कोंडीची गंभीर समस्या, पाणीप्रश्न आणि कचरा डेपोचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादीचे चेतन तुपे रिंगणात उतरले आहेत. मनसेचे वसंत मोरे यांनी गेल्या चार-पाच वर्षांपासून मतदारसंघाची बांधणी  केली आहे. आमदार योगेश टिळेकर यांचा येवलेवाडी डी.पी. कचरा प्रकल्प, स्थानिक बांधकाम व्यावसायिकांशी संगनमताने केलेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार हे प्रमुख मुद्दे घेऊन निवडणूक लढवत आहेत. टिळेकर, तुपे आणि मोरे यांच्यामध्येच हडपसरची तिरंगी लढत होत आहे. सनेचे कार्यकर्ते प्रचारामध्ये सहभागी झालेले नाहीत. सेनेकडून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केली जात असल्याचीदेखील चर्चा आहे. यामुळे याचा टिळेकरांना फटका बसणार किंवा कसे, हे महत्त्वाचे ठरणार आहे. तर राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांना मतदारसंघात असलेले सर्व नगरसेवक मदत करणार का, वसंत मोरे कात्रजसह अन्य भागातील किती मते खाणार यावर हा निकाल अवलंबून राहणार आहे.......मताधिक्य राष्ट्रवादी टिकवणार का ?लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपचे वर्चस्व असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते. तसेच राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांची संख्यादेखील भाजपच्या तुलनेत अधिक आहे.  विधानसभा निवडणुकीत हे मताधिक्य राष्ट्रवादी टिकवणार का?  हे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Puneपुणेhadapsar-acहडपसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMNSमनसेElectionनिवडणूक