शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 08:03 IST

मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले.

मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. अनेकांची घरे बुडाली आहेत. दरम्यान, आता राज्य सरकारकडे मदतीची मागणी सुरू आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर आलेल्या भागात पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी  बाधित शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सर्वतोपरी मदत केली जाईल,असे आश्वासन दिले. दरम्यान, आता मदतीवरून राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी सरकारला सवाल केले आहेत. 

मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध

"मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये गेल्या ९०-९५ वर्षांत कधीही न पाहिलेली पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. महापूराची भीषणता भयंकर आहे. या महापुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतजमिनी खरडून गेल्या आहेत आणि गाळाने भरल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीमुळे बार्शी तालुक्यातील दहिटणे, म्हात्रीवाडी आणि नारी या गावांमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने आणि जगण्यासाठी पैशांची गरज असल्याने शेतकरी सरकारकडे मदतीची मागणी करत आहेत. "आज पंजाब सारखं राज्य जर एका हेक्टरला पन्नास हजार रुपये आर्थिक मदत करत असेल एका हेक्टरला, तर मग महाराष्ट्रानं साडेआठ हजार रुपये का करावे?, असा सवाल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला.

शेतकऱ्यांना मदत मागणे यात राजकारण आहे का?

"सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, परंतु आता मुख्यमंत्री महोदयांनी 'योग्य वेळी देऊ' असे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणतीही निवडणूक नसताना कर्जमाफी दिली होती, शासनाकडे पैसे नसतील तर कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली. शेतकऱ्यांना मदत मागणे यात राजकारण आहे का?, असा सवालही त्यांनी केला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Why Maharashtra gives only ₹8500, when Punjab gives ₹50000?

Web Summary : Omraje Nimbalkar questions Maharashtra govt's ₹8500/hectare aid, contrasting it with Punjab's ₹50000, amid flood devastation in Marathwada and Solapur. Farmers demand increased financial assistance due to crop and land damage. He urges the government to provide immediate relief, even by taking loans.
टॅग्स :omraje nimbalkarओमराजे निंबाळकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस