शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
5
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
6
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
7
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
8
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
9
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
12
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
13
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
14
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
15
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
17
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
18
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
19
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
20
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : निवडणुकीच्या निमित्ताने मजुरांना आले 'सुगीचे दिवस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 18:23 IST

सहभागी होणाऱ्या मजुराला भोजन, चहाच्या सुविधेसह साडेतीनशे रुपये मिळत असल्याचे एका मजुराने सांगितले...

ठळक मुद्देरॅलीमध्ये उमेदवारांमागे 'गर्दी' दिसावी म्हणून मजुरांचा वापर

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते सभांपर्यंत उमेदवारांमागे 'गर्दी' दिसावी, यासाठी राजकीय पक्षांकडून मजुरांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो. सभा, प्रचारफेरी, मेळाव्यांमध्ये होणारी गर्दी, घोषणाबाजी, घरोघरी पत्रकवाटप करण्यासाठी दिवसरात्र पायाला भिंगरी लावून धावणारा घटक कॉमन असतो तो म्हणजे कार्यकर्ता.. पण दिसणारी गर्दी ही फक्त कार्यकर्त्यांचीच असेल असे ठामपणे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण प्रत्येक उमेदवारांच्या प्रचारकार्यात घोषणाबाजीसह अनेक कामे मजुरांकडून करून घेतली जात आहे. त्यामुळे प्रचारासाठी शहरातील मजुरांना काम मिळत असून निवडणुकीच्या निमित्ताने का होईना पुढील काही दिवसांकरिता तरी मजुरांना 'सुगीचे दिवस' आले आहेत.  विधानसभा मतदार संघाची निवडणूक २१ ऑक्टोबरला आहे. मात्र गटातटातील राजकारणामुळे पक्षाचे अनेक कार्यकर्ते प्रचारात सहभागी होण्यास उत्सुक नाहीत. उमेदवारांच्या मागे असलेली गर्दी पाहून त्यांच्या लोकप्रियतेबाबतचे अनुमान काढले जाते. त्यासाठी गर्दी जमा करावी लागते. या गदीर्साठी मजुरांचा वापर करण्याची पद्धत सुरू झाली आहे.प्रचार पत्रके वाटप करणे, मंडप टाकणे, आदी कामांबरोबरच पाण्याची व्यवस्था करणे, सभास्थानी झेंडे बांधणे, नेत्यांच्या व पक्षाच्या नावाने सभेच्या ठिकाणी घोषणा देणे, रॅलीमध्ये गर्दी दिसण्यासाठी सहभागी होणे आदी कामांचा ठेकाच ठेकेदाराला दिला जात असून मजूर मिळवून देण्यासाठी ते पुरवणाऱ्या ठेकेदारांची नियुक्ती काही पक्षांकडून केली गेल्याचे समजते. या निमित्ताने मजूर पुरवणाऱ्या ठेकेदारांचीही निवडणुकीच्या काळात चलती होते. उमेदवारांकडून प्रत्येक मजुरामागे दिवसासाठी पाचशे रुपये घेतले जात आहेत. मात्र तेवढी तितकी रक्कम मजुरांना दिली जात नाही. यामध्ये सहभागी होणाऱ्या मजुराला भोजन, चहाच्या सुविधेसह साडेतीनशे रुपये मिळत असल्याचे एका मजुराने सांगितले. .शहरात विविध ठिकाणी असलेल्या मजूर अड्ड्यावरून हे मजूर घेतले जातात. मजुरांची आवश्यकता असेल, तेवढे मजुरांना खानपानाच्या सोयीसह मजुरी देऊन घेतले जातात. प्रचारात पक्षाची टोपी डोक्यावर घालून हातात झेंडा घेऊन घोषणाबाजी करण्याचे काम मजुरांकडून केले जाते. याशिवाय पक्षाच्या राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभांमध्ये गर्दीअभावी नामुष्की ओढवू नये यासाठीही रोजंदारी देऊन मजुरांना बोलावण्याचे 'काँट्रॅक्ट' ठेकेदारांना दिले आहे. तसेच मजुरांची ने-आण करण्याची व्यवस्थाही उमेदवारांकडून केली जाणार असल्याचे समजते.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकPoliticsराजकारण