शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

कोथरूड निवडणूक निकाल २०१९ : चंद्रकांत पाटलांनी भाजपाचा बहुप्रतिष्ठित ''बालेकिल्ला '' राखला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 16:53 IST

Pune's Kothrud Election Result & Winner 2019 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोथरूड विधानसभा मतदार संघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विजय संपादन केला़..

पुणे : स्थानिक विरूध्द बाहेरचा म्हणून रंगतदार ठरलेल्या व संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोथरूड विधानसभा मतदार संघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विजय संपादन केला़. परंतू, एक लाखाहून अधिक मताधिक्क्य पाटील यांना मिळवून देऊ, हा भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेला दावा मात्र पूर्णपणे फोल ठरला आहे़. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी एक प्रकारे काटे की टक्कर म्हणून ठरलेल्या या निवडणुकीत १ लाख ४ हजार  मते मिळाली़. तर मनसेचे उमेदवार अ‍ॅड. किशोर शिंदे यांनी अनपेक्षित लढत देऊन ८० हजार मते मिळविली आहेत़. याच किशोर शिंदे यांना सन २०१४ च्या निवडणुकीत २१ हजार मते मिळाली होती़. पाटील यांना लाखाचे मताधिक्क्य देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनी, आघाडीने मनसे उमेदवार शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला असता तर पंचवीस हजाराचे मताधिक्क्य मिळाले नसल्याचे मान्य करीत या कमी मताधिक्क्याबद्दल आप-आपसात बोट दाखविण्यास सुरूवात केली आहे़.सन २०१४ मध्ये भाजप सेना स्वतंत्र लढूनही कोथरूडमध्ये भाजपच्या मेधा कुलर्णी यांना १ लाख ९४१ मते मिळाली होती़. तर शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत मोकोटे यांना ३६ हजार २७९ मते मिळाली होती़. यावेळी हे दोन्ही पक्ष एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे जाऊनही पाटील यांना या एकूण मताच्या ३५ हजार कमी मते मिळाली आहेत़. विशेष म्हणजे सन २०१४ च्या तुलनेत या २०१९ च्या निवडणुकीत कोथरूडमध्ये ५६ हजार नवीन मतदार आहेत़.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kothrud-acकोथरुडchandrakant patilचंद्रकांत पाटीलPuneपुणे