Maharashtra CM: आम्हीच हँग झालोय, काय झालंय तेच कळत नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 17:04 IST2019-11-23T16:29:26+5:302019-11-23T17:04:25+5:30
'हे अनपेक्षित आहे. असे होईल वाटले नव्हते..

Maharashtra CM: आम्हीच हँग झालोय, काय झालंय तेच कळत नाही...
बारामती : आम्हीच पूर्णपणे हँग झालोय. काय झालय तेच कळत नाही. त्यामुळे आताच काही बोलता येणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जबाबदार पदाधिकाºयाने लोकमतशी बोलतना ही प्रतिक्रिया दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचेपुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी अडचणीच्या काळात मी काही बोलणार नाही,असे सांगितले.
आज सकाळी अजित पवार यांनी भाजपच्या सोबत जात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पाडली. या अनपेक्षित आणि धक्कादायक प्रकारानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी पूर्णपणे गोंधळलेले आहेत. काय बोलावे की बोलूच नये अशा द्विधा मनस्थितीत आहेत. तर काहीनी फोन बंद करून ठेवले आहेत. याबाबत 'हे अनपेक्षित आहे. असे होईल वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी दिली. अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे बारामती शहरात देखील शांतता आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही बारामती शहरात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा आनंंद व्यक्त केला नाही. तसेच शहरातील
प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते नॉट रिचेबल झाले आहेत. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समर्थनार्थ ह्य आम्ही ८० वर्षांच्या 'योध्या' सोबत हे फलक पूर्वपरवानगीने लावले नसल्याने पोलिसांनी हटविले.
------------------------------