शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Maharashtra Bandh : 'अमृता वहिनींच्या गाण्यात जसा सुरांचा ताळमेळ नसतो, तसा आजकाल बोलण्यातही नसतो'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 5:29 PM

युपीतील लखीमपूर खेरी घटनेविरुद्ध राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बंद पुकारला आहे. महाविकास आघाडीच्या या बंदला भाजपाने विरोध केला आहे.

ठळक मुद्देवहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यातसुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी

पुणे/मुंबई - उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील घटनेच्या विरोधात महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या बंदला भाजपने विरोध केला आहे. लखीमपूर घटनेला जालियनवाला बाग म्हणताना मावळमध्ये गोळीबार झाला तेव्हा जालियनवाला बाग आठवले नाही का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. तर, महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदवरुन अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला खोचक टोमणा लगावला. त्यावरुन, आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलंय.

युपीतील लखीमपूर खेरी घटनेविरुद्ध राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बंद पुकारला आहे. महाविकास आघाडीच्या या बंदला भाजपाने विरोध केला आहे. तर, अमृता फडणवीस यांनी बंदवरुन थेट निशाणा साधला. अमृता फडणवीसांच्या टीकेला रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यातसुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी, अशा शब्दात चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलंय. 

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस

आज वसुली चालू आहे की बंद, कोणी मला अपटेड देईल का.. असे म्हणत अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. दरम्यान, 100 कोटींच्या वसुली प्रकरणाशी या बंदला जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. 

काय आहे प्रकरण

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence) इथं काही दिवसांपूर्वी एका वेगवान कारने शेतकऱ्यांना चिरडण्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात पसरले. विरोधकांनी या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. इतकचं नव्हे तर ही वेगवान कार भाजपाच्या केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र चालवत असल्याचं आरोप झाला. 

न्यायालयाने सुमोटो दाखल करुन घ्यावी - फडणवीस

कुणीतरी गाडीखाली चिरडले म्हणून इतरांना चिरडण्याचा अधिकार कुणाला मिळालेला नाही. ते जेवढे निंदनीय असेल तर त्याला समोर ठेवून असे काम होईल तर ते देखील तेवढेच निंदनीय आहे, अशी टीका करत अशा प्रकारचा बंद कसा काय पुकारला जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे बंद केले जाऊ नयेत, असे म्हटले आहे. उच्च न्यायालयाला आवाहन करेन की, याबाबत सुओ मोटो दाखल करून घ्यावी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAmruta Fadnavisअमृता फडणवीसMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदBJPभाजपाFarmerशेतकरी