राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:11 IST2021-01-21T04:11:28+5:302021-01-21T04:11:28+5:30

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे भगतसिंह कोश्यारी यांचे स्वागत व सन्मान केला. यावेळी खासदार गिरीष बापट, ट्रस्टचे अध्यक्ष ...

Mahabhishek to Dagdusheth Ganpati at the hands of Governor Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे भगतसिंह कोश्यारी यांचे स्वागत व सन्मान केला. यावेळी खासदार गिरीष बापट, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, विनायक रासने, मंगेश सूर्यवंशी उपस्थित होते. गणरायाला अभिषेक झाल्यानंतर कोश्यारी हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, आपण सर्वांनी धर्माचे रक्षण आणि पालन केले, तर आपला परिवार, देश व जगाचे कल्याण होईल. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून जी सुंदर परंपरा सुरु केली आहे. ती आजही सुरु असून पुढील अनेक युगे ती सुरु राहिल. आपणही त्याच मार्गाने पुढे जाऊ असे सांगत गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष देखील त्यांनी यावेळी केला.

फोटे- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक तसेच व आरती करण्यात आली. याप्रसंगी खासदार गिरीश बापट, ट्रस्टचे अशोक गोडसे उपस्थित हाेते.

Web Title: Mahabhishek to Dagdusheth Ganpati at the hands of Governor Bhagat Singh Koshyari