Pune Water Supply: रविवारी पुणे शहराच्या पूर्व भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 18:35 IST2022-10-14T18:35:14+5:302022-10-14T18:35:24+5:30
पाईपलाईनमध्ये गळती निर्माण झाल्याने त्याचे तातडीने दुरूस्ती काम करण्यात येणार

Pune Water Supply: रविवारी पुणे शहराच्या पूर्व भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा
पुणे : पर्वती जलकेंद्रातून लष्कर जलकेंद्राकडे जाणारी १६०० मि.मी.व्यासाची पाईपलाईनमध्ये गळती निर्माण झाल्याने, येत्या रविवारी (दि.१६) या गळतीची तातडीने दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे शहराच्या पूर्व भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर यांनी याबाबत माहिती दिली. लष्कर पाणीपुरवठा विभागाकडील भागांना रविवारी पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे सुरळीत ठेवण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे खालील भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
कमी दाबाने पाणीपुरवठा होणार भाग :-
बी.टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, कोरेगाव पार्क, संपुर्ण हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, मुंढवा, केशवनगर, माळवाडी, मगरपट्टा, सोलापूर रोड डावी बाजु, १५ नंबर आकाशवाणी, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, काळेपडळ, ससाणेनगर, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यदनगर, हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकरमठ, वैदुवाडी, आनंदनगर, रामनगर, वानवडी, साळुके विहार, आझादनगर, जगताप चौक परिसर, जांभुळकर मळा, सोलापूर रोड उत्तर बाजू, एस.व्ही.नगर, शांतीनगर, काळेपडळ, हांडेवाडी रोड, महंमदवाडी गाव, तरवडे वस्ती, कृष्णानगर, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदयनगर, लुल्लानगर, संपुर्ण पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्द, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु., शेवाळवाडी, खराडी, वडगांवशेरी पार्ट, संपुर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एन. आय. बी. एम. रोड, रेसकोर्स इत्यादी.