तोल जाऊन रस्त्याच्या कडेला झुडपात पडले; हार्ट अटॅक आल्याची शक्यता, ओतूर–ब्राह्मणवाडा रस्त्यावर दुचाकीस्वाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 10:51 IST2025-11-25T10:51:25+5:302025-11-25T10:51:33+5:30
जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीला तत्काळ ॲम्बुलन्समधून ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उचलण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीमध्ये त्याला मृत घोषित केले

तोल जाऊन रस्त्याच्या कडेला झुडपात पडले; हार्ट अटॅक आल्याची शक्यता, ओतूर–ब्राह्मणवाडा रस्त्यावर दुचाकीस्वाराचा मृत्यू
ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर-ब्राह्मणवाडा रस्त्यावरील दुसऱ्या वळणाजवळील लागाचा घाट येथे सोमवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी अपघात झाला.
एमएच १२ जे.बी. १९७१ या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून जात असताना संबंधित व्यक्तीचा तोल जाऊन तो रस्त्याच्या कडेला झुडपात खाली पडला. प्राथमिक तपासणीत त्याला कोणतीही गंभीर दुखापत नसल्याचे आढळले असून, त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. घटनेची माहिती मिळताच, परिसरातील नागरिकांसह ओतूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीला तत्काळ ॲम्बुलन्समधून ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उचलण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीमध्ये त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्तीची ओळख कृष्णा पुनाजी भोजने (वय ४५), रहिवासी आंभोळ, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर अशी झाली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.