शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

‘लॉकडाऊन’चा अजित पवारांना फटका? ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदासाठी मिळणार ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 4:52 PM

लॉकडाऊनमुळे न्यायालयाने सर्वच याचिकांवरील अंतरिम आदेश ३० एप्रिलपर्यंत कायम केले

ठळक मुद्देमाळेगाव कारखाना जुन्या संचालक मंडळाची मुदत ४ एप्रिल २०२० रोजी संपणार आहे.

बारामती : कोरोना विषाणुजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे.लॉकडाऊनमुळे न्यायालयाने सर्वच याचिकांवरील अंतरिम आदेश ३० एप्रिलपर्यंत कायम केले आहेत.त्यामुळे माळेगांव कारखान्याच्या नवनियुक्त संचालकांनी मुदत पूर्ण होईपर्यंत जुन्या संचालकांना अडथळा न आणण्याचे दिलेले आदेश ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहेत.त्यामुळे नवनिर्वाचित संचालकांना तोपर्यंत पद्भार घेण्याचा,मागण्याचा अधिकार नाही. याबाबत चेअरमन रंजनकुमार तावरे यांनी साखर आयुक्तांना पत्र पाठविले आहे. माळेगाव कारखाना जुन्या संचालक मंडळाची मुदत ४ एप्रिल २०२० रोजी संपणार असल्याने  कार्यकाळ पूर्ण करण्याचा जुन्या संचालक मंडळाचा अधिकार असल्याने  माळेगांव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांना ४ एप्रिलपर्यंत कामकाज पाहता येईल.  राज्यघटनेच्या ९७ व्या घटना दुरूस्तीच्या तरतुदीनुसार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा पदाधिकाऱ्यांना अधिकार असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने ६ मार्च रोजी आदेश दिले होते.मात्र,हा आदेश १७ मार्च रोजी वाढवुन सुनावणी २३ मार्च रोजी ठेवलेली होती. कोरोना विषाणुजन्य परीस्थितीमुळे याबाबत सुनावणी होवु शकली नाही. त्यानंतर लॉकडाऊन परिस्थितीमुळे उच्च न्यायालयाने सर्वच याचिकांवरील आदेश सुरवातीला १४ एप्रिलपर्यंत,त्यानंतर ३० एप्रिलपर्यंत कायम केले आहेत.त्यामुळे ६ मार्च रोजी उच्च न्यायालयाने जुन्या संचालक मंडळाला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करण्याचा अधिकार असल्याचा दिलेला आदेश देखील ३० एप्रिल पर्यंत कायम आहेत.त्यामुळे नवनिर्वाचित संचालकांना विद्यमान संचालक मंडळास,पदाधिकाऱ्यांना कामकाज करण्यापासुन रोखता येणार नाही,असा दावा विद्यमान अध्यक्ष रंजन तावरे यांनी केला आहे.  प्रादेशिक साखर संचालकांनी केवळ राजकीय दबावाखाली अनाधिकाराने पत्र पाठवुन कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील रंजन तावरे यांनी केला आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीSugar factoryसाखर कारखानेAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणCourtन्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस