शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांच्याही पीएफची लूट

By admin | Updated: October 7, 2016 03:34 IST

महापालिकेतील कंत्राटी वाहनचालकांच्या भविष्यनिर्वाह निधीची लूट होत आहे. सुमारे ४५० चालकांना पालिकेत अनेक वर्षे काम करीत असून ठेकेदारी पद्धतीमुळे भविष्यनिर्वाह निधी

पुणे : महापालिकेतील कंत्राटी वाहनचालकांच्या भविष्यनिर्वाह निधीची लूट होत आहे. सुमारे ४५० चालकांना पालिकेत अनेक वर्षे काम करीत असून ठेकेदारी पद्धतीमुळे भविष्यनिर्वाह निधी, राज्य कामगार विमा योजना, कामगार कल्याण निधी रजा वेतन आदी फायदे मिळायला तयार नाहीत. गेल्या काही वर्षांत किमान २ कोटी रुपयांचा या पद्धतीने अपहार झाला असल्याचे माहितीचा अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या माहितीतून उघड होत आहे.विशिष्ट ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने हा प्रकार होत असल्याने कारवाई केली जात नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. पालिकेच्या वाहनांसाठी गेली अनेक वर्षे कायमस्वरूपी चालक न घेता, कंत्राटी पद्धतीने घेतले जातात. सुमारे ४५० चालक सध्या पालिकेत या पद्धतीने कार्यरत आहेत. कायद्याप्रमाणे भविष्यनिर्वाह निधी, विमा योजना, कामगारकल्याण निधी असे सर्व नियम कंत्राटी कामगारांनाही लागू आहेत. ठेकेदाराने त्यांचे पालन करणे अपेक्षित आहे. प्रामुख्याने त्याने त्याच्याकडील प्रत्येक कामगाराचा भविष्यनिर्वाह निधीतील त्याचा हिस्सा संबंधित कामगारांच्या खात्यात नियमित जमा करणे बंंधनकारक आहे. प्रत्यक्षात त्याचा हिस्सा व कामगारांचाही हिस्सा खिशात घालून नंतर जुजबी वेतन देऊन कामगारांचे तोंड बंद केले जात आहे. याची माहिती असूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे मनसेचे म्हणणे आहे.माहितीच्या अधिकार कायद्यान्वये त्यांनी पालिकेतून यासंबंधीची सर्व माहिती मागविली होती. त्यातूनच यातील गैरप्रकार उघड झाला असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. ठेकेदाराने त्याच्या कामगारांचा भविष्यनिर्वाह निधी जमा केल्याचे चलने दाखल केल्यानंतरच त्याला त्याचे बिल दिले जावे, असा नियम आहे. प्रत्यक्षात मात्र तशी चलने दाखल केली नाहीत, तरीही त्यांना दरमहा लाखो रुपयांची बिले अदा केली जातात. वाहन विभागाने दिलेल्या कागदपत्रांतूनच हे उघड होत आहे. याविरोधात कारवाई झाली नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे शहरप्रमुख अजय शिंदे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)