शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

नोकरी, व्यवसाय संधी शोधताय..सावधान! फेक वेबसाईटवरुन होतेय फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 16:28 IST

मोठ्या भुलथापांना बळी पडू नका..

ठळक मुद्दे प्रत्यक्ष अँपॉईनमेंट लेटरही व्हाटसअ‍ॅपवर विविध कारणे सांगून पैसे उकळतात़

विवेक भुसे- पुणे : डाटा एंट्रीमधून बोलत आहे़ तुमचा बायोडाटा पाहिला़ तुम्हाला चांगली नोकरी देतो, असे मोबाईलवर फोन करुन एका तरुणाला सांगण्यात आले़. त्यानंतर त्याला विविध कारणे सांगून त्याला पैसे भरायला सांगितले़. त्यानंतरही वारंवार पैशाची मागणी करण्यात येऊ लागल्याने त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले़. एका बाजूला नोकरी नाही आणि चांगली नोकरी मिळावी, म्हणून अनेकांकडून पैसे घेऊन भरल्याने डोक्यात देणे झाले, अशी परिस्थिती अनेक तरुणांची झाली आहे़. काही जण दुसऱ्या व्यवसायात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करीत असतात़. ऑनलाईनवर नव्या व्यावसायिक संधी शोधत असलेल्यांना ऑनलाईन चोरटे शोधत असतात़. त्यांना ते जाळ्यात पकडतात़ पुण्यातील एका इस्टेट एजंटला अशीच एक आयुर्वेद ऑईलची खरेदी आमची कंपनीत शेतकऱ्यांकडून करते़. त्यात लिटरला दीड लाखाला हे तेल मिळते़ कंपनी ते अडीच लाख रुपयांना विकत घेते़, तुम्ही भारतातील प्रतिनिधी म्हणून काम कराल का अशी विचारणा करुन त्यांना भुलविण्यात आले़. तुम्हाला मिळणाऱ्या कमिशन व करारापोटी तसेच वेळोवेळी ऑईल खरेदी करण्यासाठी त्यांनी २६ लाख रुपयांना चुना लावला़. सायबर पोलिसांनी याचा तपास करुन दिल्लीतून दोघा नायजेरियनांना अटक केली आहे़. नोकरी नसल्याने अथवा असलेल्या नोकरीपेक्षा अधिक चांगल्या नोकरीच्या आशेने असंख्य तरुण आपला बायोडाटा नेटवर नोकरी संधी उपलब्ध करुन देणाऱ्या कंपन्यांच्या साईटवर टाकतात़. त्याचा गैरवापर करुन हे चोरटे तरुणांना आकर्षक पगाराची विशेषत: परदेशात नोकरीचे आमिष दाखवून सुरुवातीला रजिस्ट्रेशनसाठी , नंतर पासपोर्ट, व्हिसा, ट्रेनिंग, मेडिकल अशा विविध कारणे सांगून तुमच्याकडून पैसे उकळतात़. अनेकदा जुजबी ऑनलाईन मुलाखतही घेतली जाते़. प्रत्यक्ष अँपॉईनमेंट लेटरही व्हाटसअ‍ॅपवर पाठवितात़. पण, हे सर्व खरे असतेच असे नाही़. पण नोकरीच्या शोधात असलेल्यांना ही एक मोठी संधी असल्याचे वाटून ते त्यामागे धावत जातात आणि शेवटी त्यांच्या पदरी निराश पडते़. ...............

काय काळजी घ्याल?* आजकाल नोकरीचे सर्व अर्ज ऑनलाईन मागविले जातात़. त्यामुळे सर्वांना आता ऑनलाईनच अर्ज करावे लागतात़. पण, त्याला मिळणारा प्रतिसाद हा खरोखरच तुम्ही केलेल्या कंपनीकडूनच आहे का? याची खात्री करा़.* अनेकदा तुम्हाला येणारे कॉल हे कंपनीतून येत असले असे वाटत असले तरी ते एखाद्या परराज्यातील कॉलसेंटरमधून आलेले असतात़. * यात एक गोष्ट तरुणाने कायम लक्षात ठेवावी की, जर तो नोकरी देणार असेल तर आपण काय पैसे द्यायचे़ * आपली वैयक्तिक माहिती देताना अगोदर खात्री करुन मगच द्यावी, सरसकट बायोडाटा अपलोड करु नये़. * जी कंपनी नोकरी देणार आहे, ती कंपनी प्रत्यक्षात आहे का याची खात्री करावी़. तुमच्याच शहरात असेल तर प्रत्यक्ष त्या कंपनीच्या ठिकाणी भेट देऊन खात्री करावी़. दुसऱ्या शहरात असेल व तेथे कोणी ओळखीचे असेल तर त्यांच्यामार्फत खात्री करावी़. * ऑनलाईनवर नोकरीचे आमिष दाखविणारे परदेशातील नोकरी ऑफर करतात़. अशावेळी परदेशात ती कंपनी आहे का.? हे त्यांनी पाठविलेल्या लिंकवरुन न जाता, स्वतंत्रपणे शोध घ्यावा़ मित्र मैत्रिणींकडे चौकशी करावी़. * व्यावसायिक संधीमध्ये अनेकदा हे चोरटे पैसे गुंतविण्याची तयारी आहे, अशा लोकांचा शोध घेत असतात़ प्रामुख्याने टूर, ट्रॅव्हल्स, खरेदी विक्रीमध्य कमिशन एजंट म्हणून काम करण्याचे व भरपूर नफा मिळण्याचे चित्र रंगवितात़ प्रत्यक्षात त्या सर्व कंपन्या व्हच्युअल असतात़ अशा वेळी ते सांगत असलेले कोणते तेल खरंच तयार होते का? असे तेल जर शेतक ºयांकडून लाखो रुपयांना घेतले जात असेल तर आपले शेतकरी इतके गरीब राहिले असते का?  असा सारासार विचार या चोरट्यांच्या भुलथापांमुळे विचारायचे विसरुन जातात़. * व्यावसायिक संधी जाऊन साधावी, मात्र, तसा एखादा व्यावसाय खरोखर आहे का, याची खात्री कोणालाही पैसे देण्यापूर्वी करुन घ्यावी़ * ज्या व्यक्तीला आपण कधी भेटलो नाही, जो कोठे रहातो, हे आपल्याला माहिती नाही़ तसेच तो ज्या व्यवसाय करायला सांगतो, तो व्यवसाय करणारे आपल्या आजू बाजूला कोणी नसताना अशा अनोळख्या व्यक्तीवर विश्वास ठेवून पैसे देऊ नका़. त्यात तुमची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते़. ़़़़़़़़़़़़कंपन्यांचे नामसाधर्म्य * अनेक कंपन्यांच्या नावात नामसाधर्म्य असल्याचे आपल्याला वाटते व त्यामुळे आपण ज्या कंपनीला अर्ज केला आहे, त्याच कंपनीचा कॉल असल्याचे भासविले जाते़. प्रत्यक्षात जर्मन व रशियन सह अनेक भाषांमधील काही शब्द आणि इंग्रजी लिपी सारखी असते़ पण त्या भाषेत तिचा अर्थ वेगळा असतो़. ते आपल्याला माहिती नसते़ आपण इंग्रजी अर्थ गृहित धरतो़. त्यामुळे समोर दिसताना ते नाव तुम्हाला इंग्रजी भाषेतील वाटत असले तरी प्रत्यक्षात इतर भाषेतील असते व त्यामुळे तुम्ही कंपनीच्या साईटवर जाण्याऐवजी हॅकरच्या साईटवर जाता़ ही खात्री गुगलवर असलेल्या अ‍ॅपमधून करता येते़.अनेक तरुणांना ते माहिती असते़. पण, अशावेळी नोकरीची संधी समोर दिसल्याने त्याची खात्री करायचे राहून जाते़. चोरट्यांच्या जाळ्यात अडकतात़. ़़़़़़़़़़़नोकरी, व्यवसाय संधीचा शोध घेताना तुम्हाला प्रतिसाद देणारे खरोखर खरे आहेत का याची खात्री करणे अत्यावश्यक आहे़. गुगलवर अनेक अ‍ॅप असे आहेत की त्यायोगे संबंधित वेबसाईट या खऱ्या आहेत का याची खात्री करता येते़. नोकरी, व्यवसायाची संधी शोधताना त्याचा मदत घेऊन खात्री करावी़ जो नोकरी देणार आहे, तोच पैसे का मागतो, याचा प्रथम विचार करा़ ज्याला कधी भेटला नाही अशांना पैसे पाठवू नका़. जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे़  

टॅग्स :PuneपुणेonlineऑनलाइनjobनोकरीfraudधोकेबाजीPoliceपोलिस