लोणीकाळभोरला वाहन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:16 IST2021-02-26T04:16:26+5:302021-02-26T04:16:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका चारचाकी वाहन चोरट्यास विटे, (ता. पंढरपूर) ...

Lonikalbhor was caught by vehicle thieves | लोणीकाळभोरला वाहन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

लोणीकाळभोरला वाहन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी काळभोर : लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका चारचाकी वाहन चोरट्यास विटे, (ता. पंढरपूर) येथून ताब्यात घेतले आहे. त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत.

याप्रकरणी श्रीकांत मलकाप्पा नडगिरे (वय २५, रा. खजुरी, ता. आळंद, जि.गुलबर्गा, कर्नाटक) यास अटक करण्यात आली आहे. चोरीला गेलेली मोटार जप्त करण्यात आलेली आहे. राजू उर्फ गुड्डया मधुकर पवार (वय १९) व मोहम्मद उर्फ म्हमद्या अन्वर शेख(वय १९, दोघे रा. ढोक बाभूळगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर ) हे दोघे फरार आहेत.

डिसेंबर महिन्यात २१ तारखेला पहाटे ४ च्या सुमारास प्रीतम प्रकाश काकडे (वय २४, रा. कोरेगाव, ता. हवेली) यांच्या घरातून दोन मोबाईल व एक मोटार चारेट्यांनी लंपास केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. घराच्या बाहेरून चोरीस गेलेबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर हे करीत होते. श्रीकांत नडगिरे याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची माहिती मिळाली. तसेच श्रीकांत हा विटे ( ता.पंढरपूर ) येथेेे असल्याची माहिती

महानोर यांना मिळाली. त्यांनी पथक पाठवून पोलीस हवालदार नितीन गायकवाड, विजय गाले, रोहिदास पारखे, मारूती बाराते यांच्या समवेत जावून सापळा रचून नडगिरे याला ताब्यात घेतले. तसेच चोरलेली मोटार जप्त करण्यात आली आहे. गुन्हाची कबुली देण्यासोबतच या प्रकरणात त्याचे दोन साथीदार असल्याचीही माहिती त्याने दिली आहे. हे दोघेही फरार आहेत.

Web Title: Lonikalbhor was caught by vehicle thieves