लोणी देवकर ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक आघाडीचा दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:11 IST2021-01-19T04:11:30+5:302021-01-19T04:11:30+5:30

लोणी देवकर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण इंदापूर तालुक्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते कारण, या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुका पातळीवर गेली ...

Loni Deokar Gram Panchayat won by a landslide | लोणी देवकर ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक आघाडीचा दणदणीत विजय

लोणी देवकर ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक आघाडीचा दणदणीत विजय

लोणी देवकर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण इंदापूर तालुक्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते कारण, या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुका पातळीवर गेली पन्नास वर्षे राजकीय क्षेत्रात काम करणारे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा जेष्ठ नेते कालिदास ( आप्पा ) देवकर स्वतः उभे होते. या निवडणुकीत तालुक्यातील कोणत्याही नेत्याने सहभाग घेतला नाही, लोणी देवकर स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी झाले, त्यांची नावे पुढील प्रमाणे कालिदास देवकर, संगीता राखुंडे, शालन तोरवे, भारत गायकवाड, मंदाकिनी थोरात, उज्वला घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजयी उमेदवार धनश्री कुंभार, अजय डोंगरे, सुमित्रा डोंगरे असे एकूण नऊ उमेदवार विजयी झाले आहेत.

१८ इंदापूर लोणी देवकर

ज्येष्ठ नेते कालिदास ( आप्पा ) देवकर यांच्या सोबत नूतन सदस्य

Web Title: Loni Deokar Gram Panchayat won by a landslide