शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकाच्या खूनप्रकरणी जन्मठेप

By admin | Updated: February 4, 2015 00:22 IST

चोरी केल्याचे पाहिल्याने ७० वर्षीय मालकाचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी नोकराला जन्मठेप आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा मुख्य जिल्हा न्यायाधीश भोजराज पाटील यांनी सुनावली.

पुणे : चोरी केल्याचे पाहिल्याने ७० वर्षीय मालकाचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी नोकराला जन्मठेप आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा मुख्य जिल्हा न्यायाधीश भोजराज पाटील यांनी सुनावली.श्याम धिसालाल पाडीयार (वय २३, रा. मध्य प्रदेश) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. विनोद धीरजलाल पारेख (वय ७०, रा. कोणार्कपुरम सोसायटी, कोंढवा) असे खून झालेल्यांचे नाव आहे. २८ मे २०११ रोजी ही घटना घडली. या प्रकरणात सरकारी वकील विकास शहा यांनी १० साक्षीदार तपासले. फिर्यादी, विनोद यांची पत्नी हिरालक्ष्मी, शवविच्छेदन करणारे डॉक्टर, आरोपीच्या पिशवीतून पोलिसांनी जप्त केलेली रक्कम आणि वैद्यकीय तपासणी महत्त्वाची ठरली. या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून तत्कालीन पोलीस निरीक्षक मिलिंद ठोसर यांनी काम पाहिले. त्यांना सहायक पोलीस फौजदार दत्तात्रय पवार यांनी मदत केली. विनोद यांची मुलगी मुंबई येथे राहते. त्यांच्याकडे २००८ पासून श्याम कामाला होता. आई-वडील वयस्कर, आजारी असल्याने मुलीने श्याम याला देखभालीसाठी विनोद यांच्या कोंढवा येथील घरी २४ मे २०११ रोजी पाठविले. विनोद यांच्या घरात तिने खोल्या होत्या. एका खोलीत विनोद, दुसऱ्या खोलीत पत्नी हिरालक्ष्मी राहत होत्या. तिसरी खोली त्यांनी श्याम याला दिली होती. घटनेच्या दिवशी रात्री १ वाजता श्याम विनोद यांच्या खोलीमध्ये गेला. कपाटातून पैसे चोरू लागला. ते विनोद यांनी पाहिले. त्यामुळे त्याने विनोद यांचा गळा दोन्ही हातांनी दाबला. छातीवर बुक्के मारले. हा आवाज ऐकून हिरालक्ष्मी विनोद यांच्या खोलीत गेल्या. त्या वेळी श्याम विनोद यांच्या कॉटजवळ दिसला. बाबुजीको कुछ हो गया है, असे श्यामने हिरालक्ष्मी यांना सांगितले. त्यामुळे हिरालक्ष्मी यांनी अपार्टमेंटमध्ये राहणारे डॉ. बॅनर्जी यांना बोलाविले. त्या वेळी विनोद यांची प्रकृती गंभीर असून, रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला बॅनर्जी यांनी दिला. त्यानुसार विनोद यांना इनामदार रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान मृत्यू झाला. ४विनोद यांना नीट बोलता येत नव्हते. ते घोगऱ्या आवाजात बोलत होते. त्यामुळे डॉ. अनिल केरबा शेडगे यांनी विनोद यांना लिहिण्यासाठी कागद आणि पेन दिला. त्या वेळी श्याम याने कपाट उघडले. त्यात १ लाख रुपये असून, पत्नी हिरालक्ष्मी यांच्या जीवाला धोका असल्याचे विनोद यांनी लिहून दिले. त्यानुसार डॉ. शेडगे यांनी याबाबतची फिर्याद हडपसर पोलिसात दिली. पोलिसांनी श्याम याला अटक केली. त्याच्या खोलीत कॉटखाली असलेल्या पिशवीतून पोलिसांनी ६९ हजार ५१ रुपये जप्त केले.