शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

‘कोयता गँग’च्या ८ जणांना जन्मठेप

By admin | Updated: March 23, 2015 23:07 IST

‘कोयता गँग’मधील आठ आरोपींना राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

राजगुरुनगर : आळंदीमधील २०१२ मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी कुख्यात ‘कोयता गँग’मधील आठ आरोपींना राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राजगुरुनगर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा हा आजवरचा सर्वात महत्त्वाचा निकाल आहे. आळंदी येथे ८ जून २०१२ रोजी पद्मावती झोपडपट्टीसमोर गंगाधर ऊर्फ पिन्या रामभाऊ गडदे (वय २२) आणि गजानन रखमाजी नवघरे (वय १९, दोघेही रा. इंद्रायणीनगर, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे) यांच्यावर कोयत्याने वार करून आणि दगडाने ठेचून खून ‘कोयता गँग’च्या अकरा जणांनी त्यांचे खून केले होते. या हत्याकांडात वरील आठही आरोपींना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी २० मार्च रोजी दोषी ठरवीत त्यांच्या शिक्षेचा निकाल आजपर्यंत राखून ठेवला होता. आज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या आठ आरोपींना खून प्रकरणी जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ४ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. याबरोबरच भा. दं. वि. कलम १४३ (बेकायदेशीर जमाव जमविणे) अन्वये ६ महिने सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस सक्तमजुरी, कलम १४७ (दंगल करणे) अन्वये १ वर्ष सक्तमजुरी व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने सक्तमजुरी, कलम १४८ (घातक शस्रे बाळगून दंगल माजवणे) अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व ५०० रु. दंड व दंड न भरल्यास २ महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दुहेरी खुनातील साक्षीदार २० मार्च रोजी तपासण्यात आले. यामध्ये ५ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. या घटनेचा प्रथमदर्शी साक्षीदार बालाजी रामभाऊ गडदे याची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अरुण बबनराव ढमाले यांनी काम पाहिले. निकालानंतर पोलीस बंदोबस्तात आरोपींना येरवडा कारागृहात नेण्यात आले. (वार्ताहर)४या खून प्रकरणी शिवाजी बाबूराव भेंडेकर (वय २५), मयूर एकनाथ मानकर (वय २१, दोघेही रा. पद्मावती झोपडपट्टी, आळंदी देवाची), पिंटू ऊर्फ प्रशांत मुरलीधर चव्हाण (वय २९, रा. चऱ्होली बुद्रुक, ता. खेड), ज्ञानेश्वर सिद्धार्थ बडगे (वय २१), राहुल संदीप चव्हाण (वय २१, दोघेही रा. नगरपालिका चौक, आळंदी देवाची, ता. खेड), वीरभद्र ऊर्फ देवा रघुनाथ देवाज्ञ (रा. तारांगण वसतिगृह, धायकरवाडी, डुडूळगाव, ता. हवेली), सोमनाथ सुधाकर खुडे (वय ३२), राम महादू भोकरे (वय २३, दोघेही रा. इंद्रायणीनगर, आळंदी, ता. खेड) यांच्यासह अन्य तिघांवर खुनाचे आरोपपत्र येथील न्यायालयात ठेवण्यात आले होते. तीन आरोपी अद्यापही फरार असल्याने आठ आरोपींवर हा खटला सुरू होता.