पावसातही गिरविले योगाचे धडे

By Admin | Updated: June 22, 2015 04:36 IST2015-06-22T04:36:20+5:302015-06-22T04:36:20+5:30

शहरात पहाटेपासूनच मॉन्सूनच्या पावसाचे आगमन झाले. संततधार पावसातही नागरिकांचा योगदिन साजरा करण्याचा उत्साह कायम होता.

Lessons of yoga falling in the rain | पावसातही गिरविले योगाचे धडे

पावसातही गिरविले योगाचे धडे

पुणे : शहरात पहाटेपासूनच मॉन्सूनच्या पावसाचे आगमन झाले. संततधार पावसातही नागरिकांचा योगदिन साजरा करण्याचा उत्साह कायम होता. शाळा, कॉलेजची मैदाने व सभागृहांमध्ये भारतीय जनता पक्ष व विविध स्वयंसेवी संस्थांतर्फे रविवारी योगदिन साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी प्रमुख पाहुण्यांसह नेतेमंडळी नागरिकांनी स्वत: योगासने करून योगसाधनेचे धडे गिरविल्याचे चित्र रविवारी दिसले.
जागतिक योगदिन शहराच्या विविध भागांत राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, पतंजली योग, आर्ट आॅफ लिव्हिंग, शासकीय संस्था, शाळा व महाविद्यालयातर्फे उत्साहाने साजरा करण्यात आला. आर्ट आॅफ लिव्हिंग फाउंडेशनने महापालिकेच्या सणस मैदानावर सकाळी ६ वाजता योगदिनाचे आयोजन केले होते. त्यानुसार पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार जगदीश मुळीक, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, भारत लढ्ढा, हणमंत गायकवाड, शेखर मुंदडा यांच्या उपस्थितीत मैदानावर बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत योगदिन साजरा करण्यात आला.
स्वामी प्रज्ञापाद यांनी ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन अशा वेगवेगळ्या आसनांची प्रात्यक्षिके केली व योगसनांचे महत्त्वही उलगडून सांगितले. कार्यक्रमाचा समारोप करताना बापट म्हणाले, ‘‘योगदिनानिमित्ताने योग सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा उद्देश आहे. देशातील योग ही एक क्रांतीच आहे. सर्वांपर्यंत ही क्रांती पोहोचविणारे श्री श्री रविशंकर आणि बाबा रामदेव हे मला क्रांतिकारकच वाटतात. ही क्रांती त्यांनी कोणतेही हत्यार न घेता योगसाधनेद्वारे केली आहे.

Web Title: Lessons of yoga falling in the rain