शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

गळतीमुळे घरे, शाळेला धोका

By admin | Updated: March 23, 2017 04:12 IST

कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील बेबी कालव्यातून होणाऱ्या पाणीगळतीमुळे कालव्याच्या परिसरातील घरे व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक

उरुळी कांचन : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील बेबी कालव्यातून होणाऱ्या पाणीगळतीमुळे कालव्याच्या परिसरातील घरे व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला धोका निर्माण झाला आहे. याबाबत कुंजीरवाडी ग्रामस्थांच्या वतीने बेबी कालव्याच्या अस्तरीकरणाची मागणी हवेली तालुका शिवसेना विभागप्रमुख स्वप्निल कुंजीर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे व पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता कपोले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. बेबी कालव्यावर उभारण्यात आलेल्या पुलाच्या कमी व्यासाच्या नळ्या व कालव्यामध्ये सतत वाढणारी जलपर्णी यामुळे पाण्याचा प्रवाह वाहण्यासाठी अडथळा निर्माण होऊन पाणी झिरपण्याचे प्रमाण वाढत आहे. वर्षभरापासून सुरू केलेल्या या बेबी कालव्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. मात्र लोकवस्तीच्या ठिकाणी होणाऱ्या पाणीगळतीमुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत खराब झाले आहेत, तसेच झिरपणाऱ्या पाण्यामुळे घरांच्या भिंती, जिल्हा परिषद शाळा पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सोमवार (दि. १३) कुंजीर यांनी उपजिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे कालव्याच्या अस्तरीकरणाची मागणी केली. यावर निवासी उपजिल्हाधिकारी मुठे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित पाटबंधारे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तसेच पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता कपोले यांनी कालव्याच्या अस्तरीकरणासाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून पाणीगळतीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा आदेश संबंधित उपविभागाचे उपअभियंता बी. डी. थोरात यांना दिले. (वार्ताहर)