शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मी रस्त्यावरील दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 03:35 IST

चोवीस तास वर्दळ असलेल्या लक्ष्मी रोडवरील दुकानाचे शटर उचकटून दुकानातील तिजोरी लंपास करण्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला़ ही घटना सोमवारी रात्री साडेआठ ते मंगळवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली़

पुणे : चोवीस तास वर्दळ असलेल्या लक्ष्मी रोडवरील दुकानाचे शटर उचकटून दुकानातील तिजोरी लंपास करण्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला़ ही घटना सोमवारी रात्री साडेआठ ते मंगळवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली़
याप्रकरणी उत्तमचंद चांदमल कटारिया (वय ७४, रा़ प्रभात रोड) यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ कटारिया यांचे लक्ष्मी रोडवर आझाद क्लॉथ स्टोअर्स हे कपड्यांचे दुकान आहे़ सोमवारी सायंकाळी साडेआठ वाजता दुकान बंद झाल्यानंतर पहाटे चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला़ टेबलाचे डॉवर उचकटून त्यातील ५ हजार रुपयांची तिजोरी व तिजोरीतील ७५ हजार रुपये चोरून नेले़ मंगळवारी सकाळी पावणेआठ वाजता लोकांना दुकानाचे शटर उचकटले असल्याचे दिसून आल्यावर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला़ दुकानात सीसीटीव्ही नव्हते़ जवळ असलेला सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळून आले़
शहरात घरफोडी करणाºया चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे़ उपनगरांमध्ये दररोज ३ ते ४ घरफोड्या होताना दिसत आहेत़ असे असताना शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या व नेहमी वर्दळ असलेल्या लक्ष्मी रोडवरील दुकानाला चोरट्यांनी लक्ष्य केल्याने आज व्यापारीवर्गात त्याची चर्चा होती़
याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, या गुन्ह्याच्या तपासासाठी ४ स्वतंत्र पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे़ रात्री १२ ते पहाटे ५ या दरम्यान या भागात गस्तीसाठी २ जादा कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे़ याशिवाय बीट मार्शल, पेट्रोलिंग व्हॅनला सूचना देण्यात आल्या आहेत़

टॅग्स :Crimeगुन्हाThiefचोर