शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामांसाठी पाण्याचा बेहिशेबी उपसा

By admin | Updated: May 13, 2015 03:01 IST

जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण आणण्यासाठी अशा बांधकामांना पाणी व वीजजोड द्यायची नाही, अशी भूमिका पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त

पिंपरी : जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण आणण्यासाठी अशा बांधकामांना पाणी व वीजजोड द्यायची नाही, अशी भूमिका पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली आहे. परंतु, पिंपरी-चिंचवडमध्ये विविध भागांत राजरोसपणे अनधिकृत बांधकामे आताही सुरू आहेत. पाण्याचा बेहिशोबी वापर होत असताना, महापालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष झाले आहे. तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी अशा प्रकारचे कठोर धोरण अवलंबले. त्यांनी नव्याने मिळकत कराच्या नोंदीही थांबवल्या होत्या. परंतु, आता परिस्थिती बदलली असून, सुरू असलेल्या प्रकारावर नियंत्रण आणण्यास महापालिका यंत्रणा अपुरी पडत आहे.धरणातील पाणीसाठा विचारात घेऊन महापालिकेने एकीकडे पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. तर, दुसरीकडे बांधकामांसाठी विद्युत मोटारीने पाण्याचा उपसा करणाऱ्यांवर नियंत्रण आणणारी यंत्रणा कार्यन्वित नाही. महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे गैरफायदा उठविणाऱ्यांचे फावले आहे. ज्या ठिकाणी बांधकामे सुरू आहेत, त्यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून न राहता, हातपंप अथवा अन्य पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. परंतु, अशी व्यवस्था करणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. सद्य:स्थितीत महापालिका हद्दीत यापूर्वी झालेल्या कारवाईत अर्धवट अवस्थेत थांबवावी लागलेली बांधकामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या बांधकामांना सर्रासपणे महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा व्यवस्थेतून पाणी घेतले जात आहे. निगडी, आकुर्डी, पिंपरी, काळेवाडी, रहाटणी, भोसरी, दिघी, चऱ्होली, चिखली, मोरे वस्ती, वाकड आदी भागांत बांधकामे सुरू आहेत. मोकळ्या भूखंडावर काही बांधकाम व्यावसायिकांचे गृह प्रकल्प उभारले जात आहेत. छोट्या आकाराच्या क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या भूखंडावरील बांधकामांसाठी बोअरवेल न घेता, महापालिकेच्या जलवाहिनीवरून सर्रासपणे पाणी घेतले जाते. ज्या गृहसंस्थांमध्ये सदनिकांची वाढीव बांधकामे सुरू आहेत, ते रहिवासी तर बोअरवेल घेऊ शकत नाहीत. ते बांधकामांसाठी राजरोसपणे महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील पाणी वापरतात. अनधिकृत बांधकामांवरील कारवाई दूरची बाब, या बांधकामांसाठी होणारा मुबलक, अमर्याद पाणीवापर रोखणारी यंत्रणासुद्धा महापालिकेकडे उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती निदर्शनास आली आहे. (प्रतिनिधी)