शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात चोरट्यांनी खुपसला चाकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:18 IST

धायरी: वाहन चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी वाहनमालकाच्या पोटात चाकू खुपसून गंभीर जखमी केले असल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील ...

धायरी: वाहन चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी वाहनमालकाच्या पोटात चाकू खुपसून गंभीर जखमी केले असल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे घडली. प्रमोद किसन घारे (वय ३५, रा. सिद्धी संकल्प सोसायटी, भूमकर चौकाजवळ, नऱ्हे, पुणे) असे जखमी वाहनमालकाचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पार्किंगमधून कसला तरी आवाज ऐकू येत असल्याने प्रमोद घारे यांनी गॅलरीतून खाली पाहिले, तेव्हा त्यांना पार्किंगमध्ये त्यांच्या गाडीजवळ एक जण संशयास्पद काहीतरी करत होता. त्या वेळी ते खाली पार्किंगमध्ये उतरून गाडीजवळ गेले असता तो व्यक्ती गाडीचे लॉक तोडण्याचा प्रयत्न करत होती. त्या वेळी प्रमोद यांनी त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या दोघांची झटापट पाहून दूर उभ्या राहिलेल्या अन्य तीन अज्ञात चोरट्यांनी प्रमोद यांना पकडून मारहाण करू लागले. ‘तू इथून निघून जा नाहीतर तुला मारून टाकीन. आम्ही लय टपकवलेत, आमच्या हातून मरू नकोस.’ असे म्हणत ते शिवीगाळ करू लागले. तेवढ्यात त्यातील एका चोरट्याने चाकू काढून प्रमोद यांच्या पोटात दोन वेळा खुपसला. यात ते गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. यानंतर चोरटे वॉल कंपाऊंडवरून उडी मारून पळून गेले. पहाटे साडेतीनपासून ते पहाटे सहा वाजेपर्यंत घारे पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. सकाळी फिरायला जाणाऱ्या एकाने त्यांना पाहिले, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले.

याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

---------------------

मागील आठवड्यातही झाली होती चोरी

प्रमोद घारे राहत असलेल्या सोसायटीत मागील आठवड्यात मोठी घरफोडी झाली होती. त्या वेळीही चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप येथील रहिवाश्यांनी केला.