शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

खंडोबा पावला आणि मुका सोन्या वाचला!

By admin | Updated: September 14, 2016 03:39 IST

खरं म्हणजे जेजुरीचा खंडेराया हा देव नवसाला पावणारा देव म्हणून भाविकांची धारणा आहे. याची प्रचीतीही खंडोबाभक्त असलेल्या पुण्याच्या महाडिक परिवाराला आली आहे

जेजुरी : खरं म्हणजे जेजुरीचा खंडेराया हा देव नवसाला पावणारा देव म्हणून भाविकांची धारणा आहे. याची प्रचीतीही खंडोबाभक्त असलेल्या पुण्याच्या महाडिक परिवाराला आली आहे. लोक देवाजवळ नवस करतात आणि देवाचा नवस फेडला जातो, अशा खंडोबा देवाबाबत शेकडो घटना पाहावयास मिळतात.महाडिक परिवाराचा हा नवस माणसाकरता नव्हता, तर चक्क पाळीव श्वान (कुत्रा) सोन्या याच्याकरिता होता. अडीच महिन्यांच्या लाडक्या सोन्याला अचानक ताप आला आणि लकवा मारला होता. सुमित सीताराम महाडिक यांच्या घरात हा श्वान लहानपणापासूनच वाढला होता. त्यामुळे तो कुत्रा नसून आपल्याच घरातील एक सदस्य समजून त्याचे पालनपोषण केले जात होते. परंतु सोन्या अचानक आजारी पडला आणि महाडिक कटुंब हतबल झाले होते.पुण्यातील अनेक पशू व वन्यजीव डॉक्टर यांना दाखवण्यात आले. परंतु हा काही दिवसांचाच सोबती असल्याचे सांगण्यात आले. म्हणून खंडोबाचा धावा करण्यात आला. ‘देवा, आमच्या सोन्याला बरे कर, सव्वा किलो भंडारा वाहीन,’ असा नवस जनाबाई यांनी केला. अवघ्या काही कालावधीतच सोन्याने डोळे उघडले व तो भुंकू लागला. या वेळी मात्र महाडिक परिवारला आनंद आवरता येईना. त्यांनी खंडोबाचा जयजयकार केला. सोमवारी अनिल महाडिक, नंदकुमार धुरकर, सर्व परिवार सोन्याला घेऊन नवस फेडण्याकरिता जेजुरीत आले होते. या वेळी श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त वसंत नाझीरकर यांनी सोन्यावर भंडारा उधळला. (वार्ताहर)