खामुंडी व हिवरे खुर्द परिसरात प्रत्येकी पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:19 IST2021-03-04T04:19:28+5:302021-03-04T04:19:28+5:30

ओतूर आरोग्य केंद्र कक्षेतील खामुंडी येथे १ व हिवरे खुर्द येथे १ असे दोन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले ...

Khamundi and Hiware Khurd area each positive | खामुंडी व हिवरे खुर्द परिसरात प्रत्येकी पाॅझिटिव्ह

खामुंडी व हिवरे खुर्द परिसरात प्रत्येकी पाॅझिटिव्ह

ओतूर आरोग्य केंद्र कक्षेतील खामुंडी येथे १ व हिवरे खुर्द येथे १ असे दोन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. परिसरात एक दिवसाआड रुग्ण सापडत आहेत अशी माहिती ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.

खामुंडी गावातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३३ झाली असून त्यातील ३२ बरे झाले आहेत, १ जणावर उपचार सुरू आहेत.

हिवरे खूर्द येथील बाधितांची एकूण संख्या ३३ झाली आहे.

त्यातील २९ जण बरे झाले आहेत. २ जणावर उपचार सुरु आहेत. २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे .

ओतूर आरोग्य केंद्र कक्षेतील बाधितांची एकूण संख्या ९२४ झाली आहे. त्यातील ८६५ बरे झाले आहेत. ११ जणावर उपचार सुरू आहेत. ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

परिसरातील नागरिकांनी शासकीय नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे, असे डॉ. सारोक्ते म्हणाले.

Web Title: Khamundi and Hiware Khurd area each positive