शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खळदला अढीवाचन : यंदा समाधानकारक पाऊस

By admin | Updated: March 29, 2017 00:19 IST

खळद (ता. पुरंदर) येथे पूर्वापार परंपरेनुसार गावच्या शंभूमहादेव मंदिरात देवाच्या साक्षीने आढीवाचन करण्यात आले.

खळद : खळद (ता. पुरंदर) येथे पूर्वापार परंपरेनुसार गावच्या शंभूमहादेव मंदिरात देवाच्या साक्षीने आढीवाचन करण्यात आले. यानुसार यंदा समाधानकारक पाऊस पडणार असून राजाला चिंता तर प्रजा सुखी राहणार आहे.येथे दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी अढीवाचन करण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार पाडव्याच्या आदल्या दिवशी मंदिर परिसरात मराठी बारा महिन्यांचे बारा, राजा, प्रजा असे १४ खड्डे घेऊन त्यात वडाच्या पानात ज्वारीचे धान्य ठेवून त्याच्या पुड्या या खड्ड्यात झाकून ठेवल्या जातात.आज पाडव्याच्या दिवशी सकाळी गावातील सर्व शेकडो ग्रामस्थ एकत्र आले. त्यांच्या उपस्थितीत मानकरी साहेबराव कामथेपाटील यांच्या हस्ते व ग्रामपुरोहित अशोक खळदकर व पुजारी नंदकिशोर गुरव यांच्या पौरोहित्याखाली पूजा करीत अढीवाचन करण्यात आले.या वेळी या पुड्यातील धान्याच्या ओलाव्यानुसार ज्येष्ठ, श्रावण, कार्तिक, भाद्रपद या महिन्यात समाधानकारक पाऊस पडेल, तर वैशाख, मार्गशीर्ष, आषाढ या महिन्यात मध्यम पाऊस पडेल, तर चैत्र, पौष, माघ, फाल्गुन, आश्विन या महिन्यात कमी पाऊस असल्याचे वाचन करण्यात आले. यामुळे ऐन मोसमात पाऊस पडण्याचा अंदाज दाखवण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले व पावसाच्या या भाकणुकीच्या जोरावर चांगली पिके येतील, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.यानंतर पंचांगपूजा करून पुरोहित अशोक खळदकर यांनी पंचांगवाचन केले व सर्वांनी जनतेला हे नवीन वर्ष सुखाचेजावो व या भूमीत दुष्काळ हटवून सुकाळ येऊदे, असे साकडे शंभूमहादेवास घातले व महाआरती होऊन भाविकांना या धान्याचे वाटप करण्यात आले. (वार्ताहर)