शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला फुरसुंगी बोगद्याच्या कामाला वेग; राधाकृष्ण विखे पाटलांची विधानसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 14:00 IST

बोगद्याचे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर खालच्या भागातील शेतकऱ्यांनाही पाणी उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले

पुणे : खडकवासला ते फुरसुंगी बोगदा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, त्यासाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच ३० ते ३२ किलोमीटर लांबीच्या जुन्या कालव्याच्या पुनर्वापराबाबतही राज्य सरकार धोरण ठरवणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी (दि. १७) विधानसभेत दिली.

दौंडचे आमदार राहुल कूल यांनी विधानसभेत खडकवासला फुरसुंगी बोगदा प्रकल्प, चिबड जमिनीच्या संदर्भातील धोरण, टाटा पॉवरचे पाणी मिळणे व उजनी धरणाच्या बॅकवॉटरवर बॅरेज बांधणे आदी प्रश्नांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर विखे यांनी उत्तर दिले. यावेळी आमदार विजय शिवतारे, विक्रम पाचपुते यांनी चर्चेत सहभाग घेतला.

विखे म्हणाले, जुन्या कालव्यालगत सुमारे ३७० हेक्टर जागा उपलब्ध असून, सध्या त्या भागातील अतिक्रमणे हटवून जागा सुरक्षित करण्याचे काम जलसंपदा विभागाने सुरू केले आहे. बोगद्याचे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर खालच्या भागातील शेतकऱ्यांनाही पाणी उपलब्ध होईल. कालव्याच्या उपयुक्ततेसंदर्भात धोरण तयार करणार आहोत.

मुळशी परिसरातील टाटा धरणातून पाणी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाची टाटा पॉवरशी चर्चा सुरू असून, तत्त्वतः पाणी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. किमान सात ते आठ टीएमसी पाणी उपलब्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न असून, पुढील दोन-तीन महिन्यांत याबाबत ठोस निर्णय होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोपा बंधाऱ्यांचे रूपांतर बॅरेजमध्ये करण्याचे धोरण ठरविले असून, कार्यवाही करत आहोत. दौंड, श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील मागील भागातील गावांना पाण्याचा तुटवडा जाणवू नये, यासाठी मोठे बॅरेज उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. लाभ क्षेत्राबाहेरील चिबड जमिनीसंदर्भात शासनाने प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्पाला मान्यता दिली असून, एक ते दोन महिन्यांत त्याची अंमलबजावणी सुरू होईल, असेही ते म्हणाले.

पुरंदर उपसा सिंचन योजनेतील पाण्याच्या वाटपाबाबत निर्माण होणारा वाद टाळण्यासाठी संबंधित आमदार व विभागांशी बैठक घेऊन समन्वयातून मार्ग काढला जाईल. तसेच डिंभे धरणाशी संबंधित प्रलंबित बोगदा प्रकल्पालाही लवकरच मंजुरी देऊन काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Khडकवासला-Fursungi Tunnel Work Accelerates; Radhakrishna Vikhe Patil's Information in Assembly

Web Summary : The Khadakwasla-Fursungi tunnel project is progressing rapidly with an expected cost of ₹2,000 crore. The government will formulate a policy for reusing the 30-32 km old canal. Water will be available for farmers after completion. Discussions are ongoing with Tata Power for water supply from Mulshi dam.
टॅग्स :PuneपुणेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलDamधरणWaterपाणीMONEYपैसाvidhan sabhaविधानसभा