शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

संथाराचा अधिकार अबाधित ठेवा

By admin | Updated: August 23, 2015 04:44 IST

राजस्थान उच्च न्यायालयाने जैन धर्मातील संथारा (सल्लेखना) व्रत व परंपरा ही आत्महत्या असल्याचा निर्णय दिला आहे. परंतु, संथारा व्रत ही आत्महत्या नसून पवित्र व्रत व परंपरा आहे

पुणे : राजस्थान उच्च न्यायालयाने जैन धर्मातील संथारा (सल्लेखना) व्रत व परंपरा ही आत्महत्या असल्याचा निर्णय दिला आहे. परंतु, संथारा व्रत ही आत्महत्या नसून पवित्र व्रत व परंपरा आहे. त्यामुळे केंद्र शासनाने वरिष्ठ वकिलामार्फत आणि जैन समाजातील संतांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात अपील करावे. तसेच, हजारो वर्षांपासून चालत आलेल्या संथारा व्रताची परंपरा कायम व अबाधित ठेवण्यासाठी केंद्र शासनाने अध्यादेश काढून या व्रताला घटनात्मक अधिकार देण्यात यावा. त्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्यातील सकल जैन समाजातर्फे शनिवारी देण्यात आली. राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाने जैन धर्मीय व समाजातून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे येत्या सोमवारी (दि. २४) देशभर मूकमोर्चा काढून नाराजी व्यक्त करण्यात येणार आहे. पुण्यातील सकल जैन समाजातर्फे ओसवाल बंधू समाज चौक येथून विधानभवनापर्यंत सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे जैन समाजासह सर्व धर्मांतील नागरिकांनी आपले धार्मिक घटनात्मक अधिकार अबाधित राखण्यासाठी मूकमोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल जैन समाजातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले. या वेळी प्रसिद्ध उद्योजक फत्तेचंद रांका, विजयकांत कोठारी, अचल जैन, पोपट ओस्तवाल, मिलिंद फडे, डॉ. कल्याण गंगवाल, महावीर कटारिया, अ‍ॅड. अभय छाजेड, प्रवीण चोरबेले, लक्ष्मीकांत खाबिया, चंदूभाई शहा, अमिचंद संघवी, अशोक हिंगड, महेंद्र जैन व विपुल शहा आदी उपस्थित होते. जैन धर्मामध्ये संथारा ही आत्महत्या नाही. संथारा ही उच्च परंपरा व पवित्र व्रत मानले जाते. ही जैन धर्मातील साधना असून, शरीराच्या त्यागाचा उत्सव आहे. (वार्ताहर)